- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
आपण आजपर्यंत आरोग्य, फिटनेस व्यायाम, पोषण याबद्दल खूप चर्चा केली. परंतु अनेकदा आणखी एक आवश्यक घटक आहे ज्याकडे दुर्लक्ष होते आणि ती म्हणजे झोप. झोप म्हणजे काय, झोप किती असावी आणि त्याचे फायदे कोणते हे जाणून घेणे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे. सर्व सजीवांसाठी झोप खूप महत्वाची आहे. झोपेचे एक शास्त्र आहे, त्याचे महत्त्व आणि फायदे याला ठोस शास्त्रीय आधार आहे. पुढील दोन लेखांमध्ये आपण झोपेबद्दल चर्चा करू