WhatsApp चे 'बोल बेहेन' चॅटबॉट, एका मेसेजवर देणार हेल्थ टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Bol Behen chatbot will give health tips on messages

WhatsApp चे 'बोल बेहेन' चॅटबॉट, एका मेसेजवर देणार हेल्थ टिप्स

WhatsApp Bol Behen: चॅटिंग फ्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या यूजर्ससाठी नेहमी नवीन फिचर्स अपडेट करते, ज्यामुळे त्यांना फ्लॅटफॉर्मवर सतत मजेशीर चॅटिगसाठी पर्याय मिळतात. यावेळी WhatsApp ने आपल्या महिला यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन एक नवीन AI चॅटबॉट लॉन्च केले आहेत.

बोल बेहेन नावाच्या या चॅटबॉटमध्ये व्हॉट्सअॅपच्या महिला यूजर्सना किशोरावस्थेत होणारे शारीरिक बदल आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

हेही वाचा: बायकोशी भांडण झाल्यावर सोडलं घर; १४ वर्षांपासून तो राहतोय विमानतळावर

गर्ल इफेक्टसोबत पार्टनरशीप

व्हॉट्सअॅपने आपल्या महिला वापरकर्त्यांना ही वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी गर्ल इफेक्टसोबक पार्टनरशीप केली आहे. हा चॅटबॉट अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की,''महिला आरोग्याशी संबंधित सर्व माहिती तसेच किशोरवयीन मुलींना विचारण्यास संकोच किंवा लाज वाटते असे सर्व प्रश्न विचारू शकतात. या चॅटबॉटमध्ये किशोरवयीन मुली वेगवेगळ्या विषयांवर अनेक प्रश्न विचारू शकतात.

हेही वाचा: रक्तातील प्लाझ्मा विकून महिन्याला Disney Worldची सैर करणारी महिला

या क्रमांकावर उपलब्ध असेल सर्व्हिस

बोल बेहेन चॅट बॉट वापरण्यासाठी, व्हॉट्सअॅपच्या महिला वापरकर्त्यांना WhatsApp वर +917304496601 वर 'हाय(Hi)' पाठवावे लागेल किंवा या लिंकवर क्लिक करावे लागेल

फायदा कोणाला होणार?

WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्मवर तयार केलेला, AI चॅटबॉट (बोल बेहेन) हिंग्लिशमध्ये 24/7 उपलब्ध आहे. हे भारतातील हिंदी पट्ट्यातील किशोरवयीन मुली आणि तरुण महिलांसाठी डिझाइन केले आहे, ज्यांना सामान्यतः इंटरनेटचा मर्यादित वापर आहे.

Web Title: Whatsapp Bol Behen Chatbot Will Give Health Tips On Messages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top