Benefits of Cardamom : स्वयंपाकघरातील अतिशय महत्वपूर्ण असलेला घटक म्हणजे वेलची होय. वेलचीचा वापर अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये आवर्जून केला जातो. इतकच काय तर चहामध्ये देखील वेलचीचा वापर केला जातो. गोड पदार्थ असुदे किंवा तिखट अनेक प्रकारच्या रेसिपींमध्ये वेलचीचा वापर केला जातो.
वेलचीची बी, तेल आणि अर्क हा अतिशय प्रभावी आणि औषधी मानला जातो. त्यामुळे, वेलची ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. जेवण केल्यानंतर जर तुम्ही वेलचीचे सेवन केले तर याचे अनेक फायदे तुम्हाला मिळतील. माऊथ फ्रेशनर म्हणून ही वेलचीचा वापर केला जातो. वेलची खाण्याचे फायदे कोणते आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.
वेलचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिन्ट्स आढळून येतात. जे आपल्या शरीरातील स्नायूंना तंदूरूस्त ठेवण्याचे काम करते. मात्र, जर तुम्ही जास्त प्रमाणात वेलचीचे सेवन केले तर आपल्या शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे, पोट खराब होण्याची शक्यता असते.
वेलची ही अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणांनी युक्त आहे. त्यामुळे, तोंडात वास येत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर वेलची त्यावर माऊथ फ्रेशनरप्रमाणे काम करते. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर वेलची खाल्ल्याने दुर्गंधीची समस्या दूर होते.
यासाठी तुम्ह वेलचीची पूड करून ती पाण्यात उकळून पिल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते. शिवाय, दात किडण्यापासून ही तुम्हाला आराम मिळतो.
छोट्या वेलचीचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या जसे की, अॅसिड रिफ्लॅक्स, पोटदुखी आणि पोटात जळजळ होण्याची समस्या टाळली जाऊ शकते. शिवाय, वेलचीमध्ये असलेले बायोअॅक्टिव्ह घटक आपल्या शरीरातील पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. वेलचीचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि आपली पचनक्षमता सुधारते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.