Benefits of kidney beans : प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे राजमा; जाणून घ्या फायदे

पोषकघटकांनी समृद्ध असलेला हा राजमा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
Benefits of kidney beans
Benefits of kidney beansesakal

Benefits of Rajma : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. या गोष्टी पाळल्या तर आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. चांगल्या व्यायामासोबतच उत्तम आहार घेणे देखील महत्वाचे आहे.

या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारची फळे आणि वनस्पती आधारित घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. राजमा हा पोषकघटकांनी परिपूर्ण असलेला खाद्यपदार्थ आहे. राजमा चावल, राजम्याची आमटी, राजम्याचे सॅलेड इत्यादी अनेक पदार्थ राजम्यापासून बनवले जातात. हे खाद्यपदार्थ आवडीने खाल्ले जातात.

या राजम्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. पोषकघटकांनी समृद्ध असलेला हा राजमा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आज आपण राजम्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

Benefits of kidney beans
Benefits Of Lobia : प्रथिनांचे ‘पॉवरहाऊस’ आहे चवळी; जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

राजम्याचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे

शरीराला मिळते ताकद

राजम्यामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, राजम्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. ही ऊर्जा मिळाल्यानंतर, आपला दिवसभरातला थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.

प्रथिनांचा उत्तम स्त्रोत

राजम्यामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. मात्र, त्यासोबतच प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून ही राजम्याकडे पाहिले जाते. शाकाहारी लोकांना राजम्याचा आहारात समावेश करण्यास आवर्जून सांगितले जाते, त्यामागचे हे प्रमुख कारण आहे. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात राजम्याचा जरूर समावेश करा.

पचनक्षमता सुधारते

राजम्यामध्ये फायबर्सचे मुबलक प्रमाण आढळून येते. या फायबर्समुळे आपली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. राजम्याचे सेवन केल्याने हे फायबर्स आपल्या आतड्यांसबंधित हालचाली नियमित ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे, आपली पचनक्षमता निरोगी राहते.

Benefits of kidney beans
Benefits of Pulses : आरोग्यासाठी लाभदायी असलेली डाळ कोणती ? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

राजम्यामध्ये प्रथिने आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, जेव्हा आपण राजम्याचे सेवन करतो तेव्हा आपले पोट जास्त काळ भरलेले राहते. आपल्याला लवकर भूक लागत नाही. परिणामी आपण जास्त खाणे टाळतो. त्यामुळे, आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. थोडक्यात कायं तर वजन कमी करण्यासाठी राजम्याचे सेवन करणे हे फायदेशीर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com