Herbal Tea : दम्याचा त्रास असलेल्या रूग्णांसाठी ‘हे’ हर्बल टी आहेत फायदेशीर

हर्बल चहा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
Herbal Tea
Herbal Tea esakal

Herbal Tea : दम्याचा त्रास असणाऱ्या लोकांना आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. दमा ज्याला आपण अस्थमा म्हणून ही ओळखतो. दम्याच्या या स्थितीमध्ये फुफ्फुसांमध्ये जळजळ होते आणि ते अधिक अरूंद होतात. त्यामुळे, मग दमा लागणे, छातीत घरघर होणे, खोकला येणे आणि छाती जड होणे इत्यादी समस्या निर्माण होतात.

अस्थमाचा प्रत्येक रूग्णावर वेगवेगळा परिणाम दिसून येतो. काही प्रकरणांमध्ये अस्थमाच्या रूग्णांना सतत औषधांची मदत घ्यावी लागते तर काही रूग्णांना सतत औषधांची मदत घ्यावी लागत नाही.

परंतु, घरगुती हर्बल चहाचे काही पर्याय हे अस्थमाच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात. कोणत आहेत हे हर्बल टी जे अस्थमाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

ब्लॅक टी

आपल्या आरोग्यासाठी ब्लॅक टी अतिशय फायदेशीर आहे. अनेक जण त्यांच्या डेली रूटीनमध्ये या ब्लॅक टीचा समावेश करतात. हा ब्लॅक टी कॅमेलिया सायनेन्सिस या वनस्पतीपासून येतो.

ब्लॅक टी पिल्यामुळे, हृदयविकाराचा, अस्थमाचा आणि टाईप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. हा चहा दूध न घालता बनवला जातो. त्यामध्ये, साखर घालू नका किंवा कमी प्रमाणात घालणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.

ब्लॅक टीमध्ये असलेले फ्लोराईड्स, टॅनिन आणि फायटोकेमिकल्स हे घटक आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. हा चहा नियमित पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Herbal Tea
Tulsi And Ginger Tea : हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘हा’ हर्बल चहा आहे फायदेशीर

मध आणि दालचिनीचा हर्बल टी

मध आणि दालचिनीपासून बनवला जाणारा हा हर्बल चहा अस्थमाच्या रूग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या हर्बल चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो. ज्यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

मध आणि दालचिनीचा हर्बल चहा विविध संसर्गांच्या वाढीस प्रतिबंध घालण्याचे काम करते. हा चहा अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. दालचिनीमुळे फुफ्फुसातील जळजळ कमी होण्यास मदत होते. अस्थमा सोबतच सर्दी आणि खोकल्यासाठी हा चहा रामबाण आहे.

अस्थमाच्या रूग्णांनी सकाळी आणि संध्याकाळी या हर्बल चहाचे सेवन करावे, फक्त याचे सेवन प्रमाणात करणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Herbal Tea
Health Care : पपई खाल्ल्यानंतर 'या' पदार्थांचे करू नका सेवन, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com