Low BP
Low BPesakal

Low BP : कमी रक्तदाबाची समस्या आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी त्यांच्या आहाराची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

Low BP Remedies : आजकाल लो बीपी अर्थात रक्तदाब कमी होण्याची समस्या वाढत चालली आहे. कमी रक्तदाब ही एक अशी स्थिती आहे की, ज्यामध्ये चक्कर येणे, भोवळ येणे, अशक्तपणा येणे, बेशुद्ध पडणे इत्यादी अनेक समस्या होऊ शकतात.

ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी त्यांच्या आहाराची खास काळजी घेणे गरजेचे आहे. लो बीपीची समस्या ही कधीही कुणाला ही होऊ शकते. खरं तर या परिस्थितीमध्ये काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

ही समस्या अचानकपणे निर्माण होते आणि कधी ही होऊ शकते. त्यामुळे, अशावेळी आपण काही घरगुती उपायांची मदत देखील घेऊ शकतो. हे घरगुती उपाय अतिशय सोपे आहेत, जे तुम्ही कमी रक्तदाब झाल्यावर करू शकता.

Low BP
Hemoglobin Level : हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात करा समावेश

कमी रक्तदाबाची समस्या निर्माण झाल्यास करा हे घरगुती उपाय :

तुळस

तुळस ही औषधी वनस्पती आहे. तुळस आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वानाच माहित आहे. जेव्हा रक्तदाब कमी होतो, त्यावेळी तुळशीची पाने खाणे फायदेशीर ठरते.

कारण, तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल नावाचे एक अँटीऑक्सिडंन्ट्स असते. जे रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम करते. त्यामुळे, जेव्हा तुम्हाला लो बीपीची समस्या जाणवेल तेव्हा लगेच तुळशीची पाने खा. यामुळे, तुम्हाला आराम मिळू शकेल आणि शरीरात ऊर्जा जाणवेलं.

कॉफी

कॉफी घ्यायला कुणाला आवडत नाही. कॉफीचे सेवन करायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. कमी रक्तदाबाच्या समस्येवर कॉफी पिणे हे फायदेशीर ठरू शकते.

कॉफीमध्ये असलेले कॅफिन हे कमी रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत करते. तसेच, कॅफिनमुळे कमी रक्तदाबाची समस्या सामान्य करण्यास मदत होते. बीपी लो झाल्यास कॉफीचे सेवन केल्यावर तुम्हाला ऊर्जा मिळू शकते.

Low BP
Healthy Fruits For Winter : हिवाळ्यात फिट राहायचं असेल तर आजच ही ५ फळे खायला सुरुवात करा

मीठ

आपल्या शरीरात सोडिअम अर्थात मीठाचे प्रमाण कमी झाल्यावर रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुमचा बीपी कमी होतो किंवा लो होतो अशावेळी मीठाचे सेवन करणे हे प्रभावी ठरू शकते.

रक्तदाब कमी झाल्यावर एक ग्लास पाण्यात लिंबू आणि मीठ घालून प्या. यामुळे, तुमचा बीपी नॉर्मल होण्यास नक्कीच मदत होऊ शकेल.

चॉकलेट

शरीरात रक्तदाब कमी झाल्यावर तुम्ही गोड काहीतरी खाऊ शकता. या गोड पदार्थामध्ये चॉकलेटचा समावेश आहे. बीपी लो झाल्यावर चॉकलेटचे सेवन केल्याने कमी रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकेल. परंतु, जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर गोड चॉकलेट खाणे टाळा. या ऐवजी तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Low BP
Dark Chocolate Benefits : निरोगी हृदयासाठी आणि मेंदूसाठी डार्क चॉकलेट खाणे आहे लाभदायी, जाणून घ्या फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com