Physical Activities : शारिरीक अन् मानसिक आरोग उत्तम राखण्यासाठी घरच्या घरी करा ‘या’ सोप्या अ‍ॅक्टिव्हिटीज

Physical Activities : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि उत्तम फिटनेस राखण्यासाठी शारिरीक हालचाल करणे, गरजेचे आहे.
Physical Activities
Physical Activitiesesakal

Physical Activities : सध्याच्या काळात जिमला जाणे, ही एक फॅशनच बनली आहे. सर्व वयोगटाती व्यक्ती जिमा जाण्याला प्राधान्य देताना दिसतात. कुणी सकाळी तर कुणी संध्याकाळी जिममध्ये जातात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि उत्तम फिटनेस राखण्यासाठी शारिरीक हालचाल करणे, गरजेचे आहे. त्यासाठी, योगा, व्यायाम, जिममधील वर्कआऊट इत्यादी अनेक गोष्टी तुम्ही करू शकता.

परंतु, फिटनेस राखण्यासाठी केवळ जिममध्येच जाणे, हे आवश्यक नाही. तुम्ही जिममध्ये न जाता आणि घरच्या घरी देखील उत्तम व्यायाम प्रकार करू शकता. तज्ज्ञांच्या मते तुम्ही जिमला न जाता ही शारिरीक हालचाली करून तंदूरूस्त आणि निरोगी राहू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटींबद्दल (शारिरीक हालचालींबद्दल) सांगणार आहोत. या शारिरीक हालचाली तुम्ही घरात राहून करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटींबद्दल.

Physical Activities
Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

नृत्य करणे फायदेशीर

नृत्य केल्याने आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होते. शिवाय, शरिरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. एलिट मेडिकल सेंटरच्या एका अहवालानुसार, दररोज नृत्य करणे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. त्यामुळे, शरीरातील स्नायू मजबूत होतात. दररोज किमान ३० मिनिटे नृत्य केल्याने १५०-२५० कॅलरीज बर्न होतात. शिवाय, आवडत्या गाण्यावर नृत्य केल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारते.

रोज करा योगासन

नियमित योगा केल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तुम्ही घरी नियमितपणे योगासनांचा सराव करू शकता. योगासने केल्याने तुमचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. जर तुम्ही पहिल्यांदाच योगा करत असाल तर सुरूवातीला सोप्या योगासनांचा सराव करा.

योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते अन् पचनक्रिया सुधारते. रोज किमान ३० मिनिटे योगा केल्याने तुमचा फिटनेस उत्तम राहील आणि अनेक आजारांचा धोका कमी होईल.

बॉडीवेट व्यायाम करा

घरच्या घरी फिट राहण्यासाठी तुम्ही काही व्यायाम प्रकारांची मदत घेऊ शकता. त्यापैकीच एक असलेला बॉडीवेट हा व्यायाम तुम्ही घरी सहज करू शकता. यामध्ये स्क्वॅट्स, पुश अप्स, प्लॅंक, जपिंग जॅक आणि वॉर्मअप यांचा समावेश आहे. या व्यायाम प्रकारांचा सराव तुम्ही रोज किमान ३० मिनिटे जरी केला तरी तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

Physical Activities
Yoga Tips : ताण-तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत ‘ही’ योगासने, दररोज फक्त १० मिनिटे करा सराव

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com