Skin Care Tips: त्वचेच्या या समस्या असू शकतात बद्धकोष्ठतेची लक्षणे | These skin problems can be symptoms of constipation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

can constipation cause skin issues

Skin Care Tips: त्वचेच्या या समस्या असू शकतात बद्धकोष्ठतेची लक्षणे

मुंबई : अनेकजणांना पोट साफ न होण्याची समस्या असते. यामुळे त्वचेविषयीच्या समस्या निर्माण होतात. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांच्या त्वचेवर मुरुमे, डाग अशा गोष्टी दिसतात. (These skin problems can be symptoms of constipation)

त्वचेचा फिकटपणा

जर तुमचे पोट रोज साफ होत नसेल तर त्वचेची चमक नाहीशी होते. एवढेच नाही तर तुमची त्वचा निस्तेज दिसू लागेल. त्वचेवर निस्तेजपणा येण्यासोबतच मृत त्वचेचा थरही जमा होऊ शकतो. यामुळे तुमचा चेहरा काळा दिसू लागेल. हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

पुरळ समस्या

साहजिकच पोटाच्या आतला त्रास तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सच्या रूपात दिसेल. खरं तर, पोट साफ न होण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु पोटात घाण राहिल्याने उष्णता वाढते, त्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, जास्त घाम येणे इत्यादी समस्या सुरू होतात.

त्वचेच्या छिद्रांचा विस्तार

पोटातील उष्णतेमुळे तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुम्हाला शरीराची दुर्गंधी आणि त्वचेची छिद्रे वाढण्याची समस्या जाणवू शकते. त्वचेची छिद्रे वाढल्‍यामुळे, तुम्‍हाला वयाच्या आधी त्वचा सैल होणे आणि सुरकुत्या येण्‍याची समस्या होऊ शकते.

तेलकट त्वचेची समस्या

पोट साफ नसल्यामुळे तुमची त्वचा जास्त प्रमाणात तेलकट होऊ शकते. यामुळे तुम्हाला त्वचेची समस्या देखील होऊ शकते. तेलकट त्वचा दिसायला खूप चिकट दिसते. अनेक वेळा त्वचेवर जास्त तेलामुळे घाण चिकटते, त्यामुळे इन्फेक्शन किंवा मुरुमे होऊ शकतात.

कोरड्या त्वचेची समस्या

कधीकधी डिहायड्रेशनमुळे बद्धकोष्ठतेची तक्रार असते. अशा परिस्थितीत पोटही साफ होत नाही आणि त्वचेत कोरडेपणा येतो. असे होऊ नये असे वाटत असेल तर दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.

टॅग्स :skin carestomach