fertility | लग्नाआधी प्रत्येक पुरुषाने केली पाहिजे ही टेस्ट, फॅमिली प्लॅनिंगमध्ये होईल मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

men's fertility

लग्नाआधी प्रत्येक पुरुषाने केली पाहिजे ही टेस्ट, फॅमिली प्लॅनिंगमध्ये होईल मदत

मुंबई : महिला असो वा पुरूष सर्वांसाठीच प्रजनन चाचणी महत्त्वाची असते. बऱ्याचदा वंध्यत्वाची समस्या महिलांनाच जाणवत असल्याचा समज असतो. पण ही समस्या पुरुषांमध्येही असू शकते. आता काही वैद्यकीय चाचण्यांविषयी जाणून घेऊ या ज्यामुळे पुरुषांमधील वंध्यत्वाचे निदान होते.

हेही वाचा: हे पदार्थ करतील पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर; वैवाहिक जीवन होईल सुखी

वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या पुरुषांना टेस्टिकुलर डॅमेज किंवा नपुंसकतेची समस्या जाणवत असेल तर त्यांनी प्रजनन चाचणी करून घ्यावी. एखादी व्यक्ती कर्करोगाचे उपचार घेत असेल किंवा मूत्रमार्गावर शस्त्रक्रिया झाली असेल तरी ही चाचणी करून घ्यावी. वंध्यत्वाच्या निदानासाठी खालील चाचण्या महत्त्वाच्या ठरतात.

हेही वाचा: मासिक पाळी दिन : करोनाचं विलगीकरण संपलं; पाळीच्या विलगीकरणाचं काय ?

मेडिकल हिस्ट्री असेसमेंट - यात डॉक्टर पुरुषांच्या वंध्यत्वासाठी अनेक कारणे सांगू शकतात. उदा. - अपघात, शस्त्रक्रिया, आजारपण, इत्यादी तसेच डॉक्टर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीतील अशा काही गोष्टींबाबत सांगतील ज्यात बदल करून तुम्ही ही समस्या सोडवू शकता.

सीमन अॅनालिसिस - या चाचणीत पुरुषांच्या शुक्राणूचे आरोग्य आणि विकास क्षमतेबाबत माहिती मिळते. यात शुक्राणूंची संख्या, त्यांचा आकार आणि त्यांची हालचाल यांचे निरीक्षण केले जाते.

जनुकीय चाचणी - शुक्राणूंची संख्या कमी असेल तर त्याचा अर्थ होतो की, तुम्हाला अनुवांशिकतेमुळे वंध्यत्वाची समस्या जाणवत आहे. यासाठी तुमच्या शुक्राणूचा नमुना घेऊन तपासणी केली जाते.

हार्मोन लेवल ब्लड टेस्ट - हार्मोन हे आपल्या शरीरातील महत्त्वाचे रसायन असून याद्वारे शुक्राणूंच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवले जाते. याशिवाय लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा आणि क्षमतेवरही हार्मोन्सचा परिणाम होतो. हार्मोन्स कमी किंवा जास्त असल्याने शुक्राणूंची निर्मिती आणि लैंगिक क्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो.

फॉलिकल स्टिमिलेटींग हार्मोन आणि टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन्स प्रजननाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे वंध्यत्वाची चाचणी करताना डॉक्टर या दोन प्रकारच्या हार्मोन्सचे प्रमाण रक्त चाचणीद्वारे जाणून घेतात.

Web Title: Through These Tests Men Will Be Able To Know Their Fertility

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :fertility rate
go to top