Thyroid Patients Health Tips : थायरॉइडमध्ये चवळी खावी की नाही? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

थायरॉइडची समस्या असल्यास तुमच्या डाएटकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. जाणून घ्या थायरॉइडमध्ये चवळी खावी की नाही ते
Thyroid Patients Health Tips
Thyroid Patients Health Tipsesakal

Thyroid Patients Health Tips : हल्ली व्यायामाचा अभाव, बॅड लाइफस्टाइल आणि बऱ्याच कारणांमुळे लोकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. रोजच्या आहारात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे डायबिटीज, हाय बीपी आणि थायरॉइडच्या समस्या वाढल्या आहेत.

थायरॉइडची ग्रंथी आपल्या मानेच्या भागात असते. शरीरात महत्वाचे हार्मोन्स बनवण्यास या ग्रंथी मदत करतात. मात्र जेव्हा या ग्रंथी शरीरात सुरळीत कार्य करत नाहीत तेव्हा थायरॉइडची समस्या निर्माण होते. या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही महत्वाचे बदल केले पाहिजे. चला तर मग डायटीशियन शिवाली गुप्ताकडून जाणून घेऊया थायरॉइमध्ये चवळी खावी की नाही ते.

थायरॉइड काय असते?

थायरॉइड ग्रंथी शरीरात T1 आणि T3 सारखे आवश्यक हार्नोन्स बनवण्याचं कार्य करते. या हार्नोन्समुळे मेटाबोलिझम बूस्ट होतो. थायरॉइडचे दोन प्रकार आहेत. हायपोथायरॉयडिझम आणि हायपरथायरॉयडिझम. यात वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा येणे, मूड बदलणे, केस झडणे यांसारखी लक्षणं दिसून येतात.

थायरॉइडमध्ये चवळी खावी की नाही?

चवळी पोषक तत्वांनी युक्त असते. यात फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटामिन B6, फोलेट, प्रोटीन, आयरन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. यात फ्लेवोनोइड्स आणि फेनोलिक यांसारखे गुणधर्म आहेत. तेव्हा तुम्ही चवळीचे सेवन करू शकता.

Thyroid Patients Health Tips
Thyroid Tips : या गोष्टींमुळे होतो थायरॉइड

आयोडीन भरपूर प्रमाणात असते

आयोडीन हे शरीरासाठी आवश्यक मिनरल आहे. थायरॉइडच्या समस्येत आयोडीन महत्वपूर्ण मानले जाते. तुमच्या शरीरात आयोडीनची कमतरता असेल तर हायपोथायरॉइडीझम होऊ शकतो. तेव्हा तुम्ही चवळीचे सेवन करू शकता. (Health)

Thyroid Patients Health Tips
Thyroid Symptoms : त्रास वाढण्याआधीच ओळखा थायरॉइडची लक्षणं, बॉडीचे हे पार्ट्स देतील इशारा...

चवळी वजन नियंत्रित ठेवते

थायरॉइडमध्ये वजन वेगाने वाढते. अशात तुम्ही चवळी खाल्ल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहील. चवळीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे कॅलरी वेगाने बर्न होते आणि लठ्ठपणा कमी होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com