व्हायग्राच्या ओव्हरडोसमुळे तरुणावर शस्त्रक्रिया करून घेण्याची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viagra

व्हायग्राच्या ओव्हरडोसमुळे तरुणावर शस्त्रक्रिया करून घेण्याची वेळ

मुंबई : नपुंसकतेवरचा उपाय म्हणून घेतल्या जाणाऱ्या वायग्रा या औषधाच्या गोळीने एका २८ वर्षीय तरुणाला चांगलेच अडचणीत आणले. लग्नानंतर तीनच महिन्यांत या तरुणाने अविवेकीपणाने या गोळ्यांचे सेवन केल्याने त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. प्रयागराज येथील एमएलएन वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी या तरुणाला संकटातून बाहेर काढण्यासाठी दुर्मीळ penile prosthesis surgery केली.

हेही वाचा: कशी ओळखाल तुमच्या जोडीदाराची लैंगिक व्यसनाधीनता ? ही आहेत लक्षणे...

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले. त्याने मित्रांच्या सांगण्यावरून वायग्रा घेण्यास सुरुवात केली. त्याने आवश्यक प्रमाणापेक्षा जास्त म्हणजेच २०० मायक्रोग्रॅमपर्यंतची मात्रा घेण्यास सुरुवात केली. परिणामी तो धोकादायक स्थितीत पोहोचला. त्याच्यात priapism नावाची स्थिती निर्माण झाली व सातत्याने शिश्नाला येणाऱ्या उत्तेजनामुळे त्याला वेदना होऊ लागल्या. अशी स्थिती नपुंसकतेच्या औषधांमुळे उद्भवते.

हेही वाचा: या काही छोट्या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

अशा स्थितीत शिश्न चार तासांपेक्षा अधिक काळ उत्तेजित होते. या तरुणाच्या पत्नीने ही स्थिती ओळखल्यानंतर डॉक्टरांना माहिती दिली. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी या तरुणाचे समुपदेशन केले. त्यानंतर दोन महिन्यांनी penile prosthesis surgery करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये माणसाच्या शरीरात एक उपकरण बसवले जाते जे त्याला नपुंसकतेवर मात करण्यास मदत करते. यानंतर हा तरूण सुखी वैवाहिक आयुष्य जगू शकतो.

तरुणाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले. अशाप्रकारे लोकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय गोळ्या घेऊ नयेत. मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना डॉक्टरांनी केली आहे.

Web Title: Time To Have Surgery On A Young Person Due To An Overdose Of Viagra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top