Health Tips : Heart Attack टाळायचाय? रोजच्या जेवणात 'ही' डाळ अवश्य ठेवा

कोल्स्ट्रॉल वाढल्याने Heart Attack येऊ शकतो. तो टाळायचा असेल तर रोजच्या जेवणात मूगाची डाळ असायलाच हवा. त्यात असलेल्या पोषक तत्वांमूळे आरोग्यास लाभदायी म्हटले आहे.
Health Tips
Health Tipsesakal

डाळी, कडधान्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यात मूग डाळ सर्वात आरोग्यदायी मानली जाते. आयुर्वेदानेही याचे वर्णन 'डाळींची राणी' असे केले आहे. (Health Tips) मूग डाळीचे दोन प्रकार आहेत - हिरवी मूग डाळ आणि पिवळी मूग डाळ. (How To Reduce Cholesterol Diabetes)

Health Tips
Health Tips : झोपेची सायकल बिघडलीये? रात्री 'या' गोष्टी खाणे टाळा

मुगाची डाळ खाणे आरोग्यदायी मानले जाते कारण त्यात मुबलक प्रमाणात पोषक असतात. फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक ऍसिडस्, सेंद्रिय ऍसिडस्, एमिनो ऍसिड, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, मूग डाळीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीडायबेटिक, अँटीहाइपरटेन्सिव्ह गुणधर्म असतात. जे अनेक आजारांवर उपचार करण्यास उपयुक्त ठरू शकते.

Health Tips
Health Tips : हे दोन पाँईंट दाबा आणि शुगर पूर्ण कंट्रोल करा

त्यात असलेल्या पोषक तत्वांमुळे, आयुर्वेदामध्ये डाळी नियमितपणे खाण्याची शिफारस केली जाते. शिवाय, ते पचायला सर्वात सोपा आणि हलक्या असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचा मेंदूवर सात्विक प्रभाव पडतो. मूगामध्ये आढळणारे पॉलीफेनॉल, जसे की विटेक्सिन, गॅलिक अॅसिड आणि आयसोविटेक्सिन यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे जळजळ आणि वेदनांवर उपचार करण्यास मदत करतात. त्यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी मूग डाळ खाणे चांगले ठरू शकते.

Health Tips
Health: सततची डोकेदुखी असले, तर आता पेनकिलर ऐवजी या घरगुती उपायांनी दुर करा डोकेदुखी

१) मूग डाळीचा कोलेस्ट्रॉल कमी करणारा प्रभाव असतो. या प्रभावामुळे, मूग डाळ रक्तातील एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे काम करते.

२) मुगाची पावडर आणि फेस पॅक लावल्याने त्वचा चमकदार होते, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. यासोबतच ही डाळ मुरुम, एक्जिमा आणि खाज यापासून आराम देण्याचे काम करतात.

Health Tips
Health News : मेथी पावडरचे महिलांसाठी कोणते फायदे आहेत? जाणून घ्या...

३) डॉक्टर दीक्षा सांगतात की शिजवण्यापूर्वी मूग भिजवायला विसरू नका. भिजवल्याने त्यातील फायटिक ऍसिड काढून टाकले जाते ज्यामुळे पोषक तत्वांचे पचन आणि शोषण करणे सोपे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com