Eye Care : सुंदर जग बघण्यासाठी डोळ्यांना सांभाळा, अशी घ्या काळजी

रात्रीच्या वेळेस मोबाईलचा अतिवापर दृष्टीदोषाचे कारण बनू शकते.
Eye Care
Eye Careesakal

Eye Care : अन्न, वस्त्र निवारा या मानवी गरजांमध्ये आता मोबाईल सामील झाला आहे. अलीकडे ज्येष्ठांपासून चिमुकल्यांनाही मोबाईलचे व्यसन जडले आहे. मोबाईल फोन शिवाय पाच मिनिटही विरह अनेकांना सहन होत नाही. मोबाईल हे आर्थिक व्यवहाराचेही साधन बनले आहे. मुले मोबाईलवर कार्टून बघत, गाणी बघत, गेम खेळत जेवण करतात. पण या सवयीमुळे लहान वयातच अधिक नंबरचा जवळ-दूरचा चष्मा मुलांना लागत आहे. विशेष असे की, रात्रीच्या वेळेस मोबाईलचा अतिवापर दृष्टीदोषाचे कारण बनू शकते.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

मोबाईलच्या अतिवापराचे डोळ्यांवर होणारे परिणाम

रक्तातील साखर अनियंत्रित होण्याची शक्यता

डोळ्यात कोरडेपणा

डोळे खाजवणे

मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता

मोबाईलचे वेड कमी करण्यासाठी टिप्स

मुलांनी कोणते ॲप किती वेळ वापरावे, हे पालकांनी ठरवावे.

अतिवापरामुळे डोळ्यांचे नुकसान होते याची मुलांना जाणीव करून द्यावी.

घरी मोबाईलवर जास्त वेळ असल्यामुळे मुलांना उद्यानात फिरायला न्यावे

Eye Care
Eye Care Tips : गेलेली दृष्टीसुद्धा परत येईल, फक्त या व्हिटॅमिनची साथ कधी सोडू नका

रेटिनाच्या आरोग्यासाठी उपाय

चांगला आहार

निरोगी जीवनशैली

वेळोवेळी नेत्र तपासणी (Eye Care)

Eye Care
Eye Care Tips : तुम्हीही जोर देऊन डोळे चोळताय का? दृष्टीवर होतील दुष्परिणाम

व्हिटॅमिन ‘ए’ (लहान मुलांना द्या)

रात्री झोपण्याच्या वेळेत मोबाईल फोनवर असल्यामुळे मेंदू ॲक्टिव्ह मोडवर राहातो. मेंदूला आराम मिळत नाही. झोपल्यानंतर मेंदू विश्रांतीच्या स्थितीत जातो. मेंदूला आराम न मिळाल्यास मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या स्क्रीनवर असल्याने मेलाटोनिन हार्मोनची पातळी कमी होते. यामुळे स्ट्रेस वाढतो. मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळेही डोकेदुखी होऊ शकते. रेटिनाच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जागरूक राहणे, दृष्टी सांभाळणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

-डॉ. पीयुष मदान, रेटिना तज्ज्ञ, मेडिकल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com