
थोडक्यात:
दरवर्षी १ ऑगस्ट रोजी जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा केला जातो, ज्याचा उद्देश जनजागृती वाढवणं हा आहे.
हा दिवस २०१२ साली FIRS आणि इतर संस्थांनी सुरू केला, ज्यामागे त्वरित निदान व प्रतिबंधावर भर देण्याचा हेतू होता.
फुफ्फुसाच्या कर्करोगासंदर्भातील चुकीच्या समजुतींमुळे निदान उशिरा होतो, त्यामुळे त्याबाबत स्पष्टता निर्माण करणं आवश्यक आहे.
Facts About Lung Cancer That Are Actually Myths: दरवर्षी १ ऑगस्ट रोजी जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा केला जातो. या रोगाविषयी जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 2012 साली आंतरराष्ट्रीय श्वसन समाज मंच (FIRS) आणि इतर काही संस्थांनी एकत्र येऊन या दिवसाची सुरुवात केली. फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित गैरसमज दूर करणे, त्वरित निदानाचे महत्त्व सांगणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
पण आजही फुफ्फुसांचा कर्करोग हा केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच होतो, अशी समजूत अजूनही समाजात रूढ आहे.पण त्यामागे वेगळं कारण आहे. अशा अनेक गैरसमजांमुळे अनेक वेळा निदान उशिरा होतं आणि उपचार घ्यायला लोक वेळ घालवतात. त्यामुळे यासंबंधित गैरसमज दूर करून स्पष्टता येणे अत्यंत गरजेचे आहे.
"मी धूम्रपान करत नाही, त्यामुळे मला कर्करोग होणार नाही."
हा सर्वांत सामान्य आणि अतिशय चुकीचा गैरसमज आहे. फुफ्फिसांचा कर्करोग फक्त म्रपानामुळे होत नाही. त्यासाठी अनेक घटक कारणभूत असतात. प्रदूषित हवा, औद्योगिक रसायनांचा संपर्क किंवा अनुवंशिक कारणांमुळेही धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीला फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो.
"काही गंभीर असेल तर नक्कीच लक्षणं दिसतील."
कोणत्याही प्रकारच्या कर्करोगांचा सुरुवातीला कुठलाही त्रास होत नाही. खोकला, दम लागणे यासारखी लक्षणं उशिरा दिसू लागतात. मात्र तेव्हा या आजाराने पुढचा टप्पा गाठला असतो.
"फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे मृत्यू नक्की आहे."
सध्या तंत्रज्ञान प्रगत झालं आहे. याचा प्रभाव वैद्यकीय क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात पडला आहे. त्यामुळे ही समजूत चुकीची ठरते. वेळेवर आणि त्वरित निदान झालं तर योग्य उपचारांनी बराच फरक पडतो. टार्गेटेड थेरपी, इम्यूनोथेरपीसारख्या नव्या उपचार पद्धती मुळे काही रुग्ण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतात.
"एकदा निदान झाल्यावर धूम्रपान सोडून काही उपयोग होत नाही."
कर्करोगाचं निदान झाल्यावर धूम्रपान थांबवणं महत्त्वाचं आहे. यामुळे शरीराला अधिक हानी होण्यापासून आणि उपचारांचा चांगला प्रभाव पडण्यासाठी फायदेशीर ठरते. याचसोबत श्वसन सुधारण्यासाठी देखील मदत होते.
"हा आजार फक्त वयस्कर पुरुषांनाच होतो."
वास्तविक पाहता, सध्या अनेक तरुण-तरुणींना देखील फुफ्फुसांचा कर्करोग होतो. फक्त वय आणि लिंग नाही तर इतरही घटक यासाठी जबाबगदार असू शकतात.
"फुफ्फुसांचा कर्करोग फार लवकर पसरतो, त्यामुळे उपचारांचा उपयोग होत नाही."
सर्व प्रकार एकसारखे वेगाने वाढणारे नसतात. काही प्रकार हळूहळू वाढतात आणि त्यांच्यावर दीर्घकालीन उपचार शक्य असतो. लवकर निदान झाल्यास उपचारांचं यश जास्त असतं.
"सतत खोकला म्हणजे फक्त प्रदूषण किंवा अॅलर्जीचा परिणाम आहे."
शहरातील प्रदूषणामुळे खोकला सामान्य वाटू शकतो. पण काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा किंवा वाढणारा खोकला दुर्लक्षित करू नका. ही फुफ्फुसांशी संबंधित गंभीर लक्षणं असू शकतात.
"उपचार केल्यावरही कर्करोग परत येतो."
कर्करोग पुन्हा येण्याची शक्यता असली तरी प्रत्येक वेळी असंच घडतं असं नाही. योग्य उपचार, नियमित तपासणी आणि निरोगी सवयी यामुळे अनेक लोक दीर्घकाळ कर्करोगमुक्त राहतात.
फुफ्फुसांचा कर्करोग फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच होतो का? (Is lung cancer only caused by smoking?)
नाही. जरी धूम्रपान हा फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी एक मोठा धोका असला तरी केवळ तोच एकमेव कारण नाही. वायूप्रदूषण, औद्योगिक रसायनांचा संपर्क, घरगुती धूर, आणि आनुवंशिकता यांसारखे इतरही अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात.
सुरुवातीच्या टप्प्यात फुफ्फुसाचा कर्करोग ओळखता येतो का? (Can lung cancer be detected in its early stages?)
हो. काही प्रकरणांमध्ये लवकर निदान शक्य होतं, पण अनेक वेळा सुरुवातीला कोणतीही ठोस लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे जोखीम गटात असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
कर्करोगाचे निदान झाल्यावर धूम्रपान थांबवल्याने काही फायदा होतो का? (Does quitting smoking after a diagnosis still help?)
होय, नक्कीच. निदानानंतर धूम्रपान थांबवल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात, शरीराची ताकद वाढते आणि आजाराशी झगडण्याची क्षमता सुधारते.
फुफ्फुसाचा कर्करोग पुन्हा होण्याचा धोका असतो का? (Can lung cancer come back after treatment?)
पुन्हा होण्याची शक्यता असली तरी ती प्रत्येक रुग्णामध्ये सारखीच नसते. उपचार पूर्ण केल्यानंतरही नियमित तपासण्या, आरोग्यविषयक सवयी आणि डॉक्टरांचा सल्ला यामुळे पुन्हा होण्याचा धोका कमी करता येतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.