Do These Yoga Asanas For Cough And Cold
Do These Yoga Asanas For Cough And Coldsakal

Yoga For Cough And Cold: सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी करा 'ही' योगासने

Do These Yoga Asanas For Cough And Cold: योग मन, शरीर आणि आत्म्याचा समतोल साधणारी एक प्राचीन पद्धती आहे. सर्दी आणि खोकल्यासारख्या त्रासांवर मात करण्यासाठी योग फायदेशीर ठरतो.
Published on

थोडक्यात:

  1. सतत बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढले असून औषधांसोबतच पर्यायी उपायांची गरज जाणवते.

  2. योग ही केवळ तंदुरुस्तीची नव्हे तर मन-शरीर-आत्म्याचा समतोल साधणारी प्रभावी प्राचीन पद्धत आहे.

  3. श्वसन प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि कफ मोकळा करण्यासाठी योगासने आणि ध्यान उपयुक्त ठरतात.

Yoga Asanas For Cough And Cold: सततच्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढले आहे तसेच इतरही विषाणूंचा संसर्ग बऱ्याच जणांना होत आहे. अशातच योग्य आहार, व्यायाम, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे हे अत्यावश्यक झाले आहे. आणि जेव्हा हे सगळे करूनही सर्दी आणि खोकला बरा होत नाही तेव्हा आपण औषधांच्या पलीकडे काही उपाय आहे का ते शोधू लागतो. आणि इथेच योगाची प्राचीन पद्धती अस्तित्वात येते.

योग ही फक्त शारीरिक तंदुरुस्तीची पद्धती नसून, मन, शरीर आणि आत्म्याचा समतोल साधणारी एक प्राचीन पद्धती आहे. खासकरून सर्दी आणि खोकल्यासारख्या त्रासांवर मात करण्यासाठी योग फायदेशीर ठरतो. नियंत्रित श्वसन प्रक्रिया, साधी व हलकी योगासने आणि ध्यान यांचा योग्य मेळ साधल्यास श्वासोच्छवास सुधारतो, छातीत साठलेला कफ मोकळा होतो, आणि शरीराला ताजेतवाने वाटते.

श्वसनावर योगाचा प्रभाव

योगामध्ये प्राणायामाच्या मदतीने श्वसन प्रक्रिया सुधारण्यासाठी विशेष भर दिला जातो.

फुप्फुसांची क्षमता वाढते

खोलवर श्वास घेतल्यामुळे फुप्फुसांचा विस्तार होतो आणि श्वसन अधिक सुलभ होते.

ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो

धीम्या श्वसनामुळे शरीरातील पेशींना अधिक ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे ऊर्जा आणि चैतन्य वाढते.

वायुमार्ग स्वच्छ होतो

काही योगासनांमुळे छातीत साठलेला कफ मोकळा होतो आणि श्वसन मार्ग मोकळा होतो.

Do These Yoga Asanas For Cough And Cold
Yoga for Busy Lifestyle: धावपळीच्या जीवनात शरीर अन् मनाच्या आरोग्यासाठी ‘षट्क्रिया’ आणि योगाचे अद्भुत लाभ

हळू श्वासोच्छवास करण्याचे महत्त्व

सर्दी आणि खोकल्याची लक्षणे नाहीशी करण्यात मंद गतीत श्वासोच्छवास करण्याचे व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्दी झाली की शरीर आपोआप जलद आणि उथळ श्वास घ्यायला लागते. यामुळे खोकला वाढतो आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते.

मंद गतीतील श्वासोच्छवास खालील गोष्टींचा प्रतिकार करतो

- हळूहळू, खोल श्वास घेण्यामुळे शरीर सक्रियपणे रिलॅक्स होते, ताण कमी होतो आणि शरीर पूर्णपणे बरे होण्यावर लक्ष केंद्रित करू शकते.

- हळू श्वासोच्छवासामुळे खोकल्याचा रेफ्लेक्स कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे सततच्या खोकल्यापासून आराम मिळतो.

- हळूहळू श्वास घेताना खोल सगवस सोडल्याने कार्बन डायऑक्साइड आणि इतर टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते, जे शरीर संसर्गाशी लढत असताना फायदेशीर ठरते.

- हे व्यायाम मज्जासंस्थेचा समतोल राखण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर शांत राहते आणि एकूण आरोग्य सुधारते.

सर्दी व खोकल्यावर प्रभावी योगासने

बालासन

या शांत व बैठी आसनात हलके पुढच्या बाजूला वाकायचे असते. ज्यामुळे छाती आणि नाकाचा, श्वासनाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होते. डोक्याला हृदयाच्या खालच्या बाजूला रिलॅक्स होऊ द्या. यामुळे सर्दीच्या वेळी शरीराला आवश्यक असलेली विश्रांती मिळते आणि ताण कमी होतो.

सेतू बंधासन

या आसनात तुम्हाला पाटीवर झोपून कंबर वर उचलायची असते, ज्यामुळे छाती आणि फुफ्फुसे मोकळी होण्यास मदत होते. या तयार झालेल्या मोकळीकीमुळे श्वासोच्छवास चांगला होण्यास मदत होते आणि दम लागणे व श्वास घेताना होणार त्रास हे कमाई होण्यास मदत होऊ शकते. फुफ्फुसांची एकूण क्षमता आणि श्वसन कार्य वाढवण्यासाठी उभे राहून केलेले सेतू बंधासन हे एक उत्तम आसन आहे.

Do These Yoga Asanas For Cough And Cold
Tadasana Benefits: उंची वाढवायचीये? दररोज फक्त 3 मिनिटं 'ताडासन' करा! लगेच दिसतील बदल

उत्तनासन

या आसनात तुम्ही कंबरेपासून पुढे वाकता, ज्यामुळे नाक मोकळे होते आणि सायनसचा दाब कमी होतो. उभे राहून पुढे वाकण्याचा आणखी एक फायदा म्हणजे डोके हृदयाच्या खालच्या बाजूला टेकवले जाते, त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.

भुजंगासन

पोटावर झोपून, हात छातीजवळ जमिनीवर तसेच ठेवून, छातीपासूनचे शरीर मागच्या बाजूला वाकवणे, यामुळे फुफ्फुसांना अराम मिळतो. तसेच खोलवर श्वास घेता येतो आणि फुफ्फुसातील कफ बाहेर टाकण्यास मदत होते. हे फुफ्फुसांची ताकद वाढवते आणि खोकल्याच्या त्रासातून आराम मिळवण्यासाठी उपयोगी ठरते.

याव्यतिरिक्त अनुलोम-विलोम आणि कपालभारतीसारखे प्राणायाम करणे सर्दी आणि खोकला कमी करण्यास फार उपयुक्त तसे प्रभावी ठरू शकते.

ही छातीतील दाब, सर्दी आणि खोकल्यासाठी साधी, हलकी आणि प्रभावी योगासने आहेत. ही योगासने आरोग्याच्या इतर फायद्यांसह सर्दी आणि खोकल्याच्या लक्षणांवर प्रभावीरीत्या काम करतात. परंतु आपल्या आराम व सोयीनुसार, कोणताही ताण न घेता आणि योग्य पद्धतीनेच या योगसनांचा सर्व करा. खास तुम्ही खूप आजारी असाल तर. तसेच या योगासनांचा सर्व करूनही जर लक्षणे कायम राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

FAQs

१. सर्दी आणि खोकल्यावर योग का फायदेशीर ठरतो?
(Why is yoga effective for cold and cough?)
योगामुळे श्वसनमार्ग मोकळे होतात, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि शरीराला नैसर्गिकरित्या बरे होण्यास मदत होते. प्राणायाम आणि काही विशिष्ट योगासने कफ कमी करण्यात उपयोगी पडतात.

२. कोणती योगासने सर्दी आणि खोकल्यावर विशेषतः उपयुक्त आहेत?
(Which yoga poses are especially helpful for cold and cough?)
बालासन, सेतू बंधासन, उत्तनासन, आणि भुजंगासन ही आसने श्वसन सुधारण्यासाठी आणि छातीत साचलेला कफ मोकळा करण्यासाठी उपयुक्त आहेत.

३. सर्दी-खोकल्याच्या त्रासात योगासनं करताना कोणती काळजी घ्यावी?
(What precautions should be taken while doing yoga during cold and cough?)
योग करताना कोणताही ताण न घेता, शरीराच्या क्षमतेनुसार आसने करावीत. जास्त त्रास होत असेल किंवा लक्षणे तीव्र असतील, तर योगाऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

४. योग केवळ सर्दी-खोकल्यावर काम करतो का?
(Does yoga only help with cold and cough?)
नाही, योग हे संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. हे केवळ सर्दी-खोकल्यालाच नाही, तर तणाव कमी करण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठीही मदत करते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com