
मांसाहारी पदार्थांना देतील तगडी टक्कर, ट्राय करा हे प्रोटिनयुक्त पदार्थ
दररोज प्रोटीनयुक्त पदार्थ शरीराराला आवश्यक असतात शिवाय प्रोटीनमुळे आरोग्याशी संबंधित समस्याही दूर राहतात. प्रोटीन तुम्हाला दिवसभर उत्साही राहण्यास मदत करते.
असं म्हणातात की मांस-चिकनमधून सर्वात जास्त प्रोटीन शरीराला मिळतात. हो, हे खरंय पण तुम्हाल माहिती आहे का काही असे शाकाहरी पदार्थ आहे ज्यापासून तुम्हाला मांस-चिकनच्या दुप्पट प्रोटीन मिळणार. हो, हे खरंय. जर तुम्ही मांस-चिकन खात नाही आणि तुम्ही शाकाहरी असाल तर तुम्हालाही या पदार्थांपासून प्रोटीन मिळू शकते.
हेही वाचा: Healthy Lifestyle: आठवड्याभरात वजन होणार कमी; या वेळी करा ड्रायफ्रुट्सचे सेवन
चला तर जाणून घेऊया.
राजगिरा
राजगिरा हा प्रोटीन आणि अमीनो अॅसिडचा उत्कृष्ट स्रोत आहेत. त्यामुळे राजगिराचे सेवन करणे आपल्यासाठी उत्तम आहे.
शेंगदाणे
शेंगदाण्यात जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. शेंगदाण्यामध्ये सर्व 20 अमीनो अॅसिडचे प्रमाण असते आणि या शिवाय 'आर्जिनिन नावाच्या प्रोटीनचा शेंगदाणे खुप मोठा स्त्रोत आहे.
हेही वाचा: Healthy Diet : जेवण्याची पद्धत, खाण्याची कला!
हिरवी मूग दाळ
हिरवी मूग दाळीला प्रोटीनचा खुप मोठा स्त्रोत आहे. हिरवी मूग दाळ आपण रोजच्या आहारात घेऊ शकतो. या मोठ्या प्रमाणावर अमीनो अॅसिड असते.
चणे
चणे हे प्रोटीनयुक्त पदार्थ समजले जाते जे शाकाहारी आहारात सर्वाधिक प्रचलित आहे. चणामध्ये जवळपास 18% प्रोटीन असते. याशिवाय चणेमध्ये लाइसिन आणि आर्जिनिनने अमिनो अॅसिडचेही प्रमाण दिसून येते.
पनीर
दिवसभरातील तुमचे प्रोटिनचे सेवन बॅलेन्स करण्यासाठी पनीर हा एक सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. पनीर हा कमी किमतीत उपलब्ध असतो आणि शाकाहारी लोकांसाठी उत्तम स्रोत आहे
Web Title: Try These Food Will Give You High Protein Than Non Veg Chicken Meat Mutton
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..