Healthy Lifestyle: वजन कमी करायचं? जेवणात 'या' भाज्यांचा समावेश करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lifestyle

Healthy Lifestyle: वजन कमी करायचं? जेवणात 'या' भाज्यांचा समावेश करा

प्रत्येकाला असं वाटतं की आपण हेल्दी खावं त्यात वजन कंट्रोलमध्ये ठेवणे खुप मोठं आव्हान आहे. पावसाळ्यात तर वजन वाढण्याच्या अनेक समस्या दिसून येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला वजन कसं नियंत्रित ठेवायचं, यासंदर्भात सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात खालील भाज्यांचा समावेश करायचा आहे. चला तर जाणून घेऊया. (try these vegetables to make weight loss check here list)

हेही वाचा: Health Tips: जाणून घ्या अंजीर खाण्याचे फायदे

बीट : वजन कमी करण्यासाठी आहारात बीटचा समावेश करणे, उत्तम असतो. बीटचा सलाद किंवा ज्यूस शरीरासाठी खुप फायदेशीर असतं. बीटमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. बीटरूट खाल्ल्याने लोजास्त वेळ भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

पालक : पालक ही शरीरास अत्यंत पोषक असते. पालक खाल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पालकमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. पालकमध्ये व्हिटामिनमध्ये A, C आणि K तसेच मॅग्नेशियम आणि मॅंगनीजचेही प्रमाण असते. यामुळे वजन कमी करण्यास पालक उपयुक्त आहे.

हेही वाचा: Raju Srivastava Health Update: 'तो आता...' सेक्रेटरीची प्रतिक्रिया चर्चेत

गाजर : गाजर हल्ली १२ ही महिने बाजारात दिसून येतात. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात गाजराचा समावेश जरूर करावा. गाजरांमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. गाजरमध्ये व्हिटॅमिन A, बीटा कॅरोटीन आणि फायबरचे प्रमाण असते.

Web Title: Try These Vegetables In Meal To Make Weight Loss Check Here List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..