Raju Srivastav Health Update: 'तो आता...' सेक्रेटरीची प्रतिक्रिया चर्चेत |Raju Srivastav health update secretary reaction viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastav Health Update

Raju Srivastava Health Update: 'तो आता...' सेक्रेटरीची प्रतिक्रिया चर्चेत

Raju Srivastava Health Update: प्रसिद्ध कॉमेडियन राजु श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत त्याचे चाहते काळजीत पडले आहे. गेल्या सगा दिवसांहून अधिक (Tv Entertainment News) काळ राजु हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र राजुची प्रकृती त्या उपचारांना फारसा सकारात्मक (Actor Raju Srivastav) प्रतिसाद देत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी डॉक्टरांनी त्याच्या एमआरआय रिपोर्टवरुन मोठी माहिती दिली होती. राजुच्या मेंदूतील काही नस या दबल्या गेल्या आहेत. त्यामुळे तो बराच (Social media viral news) काळापासून बेशुद्ध अवस्थेत आहे. तो तातडीनं बरा व्हावा यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले होते.

यासगळ्यात राजुचा पर्सनल सेक्रेटरीची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. (commedian raju srivastava news) त्यामध्ये त्यानं दिलेल्या माहितीनं थोड्याफार प्रमाणात चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र राजुच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीमध्ये देखील त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते. चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी देवाचा धावा करावा असे म्हटले होते. राजुचा सेक्रेटरी गर्वितनं सांगितलं की, आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 10 ऑगस्टला हदयविकाराचा झटका आला होता. ट्रेड मिलवर धावताना तो अचानक पडला. आणि बेशुद्धवस्थेत गेल्याचे सांगण्यात आले होते. सध्या राजु हा एम्समध्ये दाखल असून स्वतंत्र डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. मेंदूतील नस दबली गेल्यानं त्यापर्यत ऑक्सिजन पोहचत नसल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. अजुनही राजु हा व्हेंटिलेटरवर आहे.

हेही वाचा: Raju Srivastav : राजूच्या भावाने सांगितले शुद्धीवर न येण्याचे कारण; म्हणाला...

राजुचा सेक्रेटरी गर्वितनं एएनआयनला दिलेल्या माहितीमध्ये असे सांगितले आहे की, आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. राजु हा लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना सुरु केली आहे. एम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजुच अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यानंतरही तो शुद्धीत न आल्यानं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी देखील राजुच्या प्रकृतीविषयी विचारपूस करुन त्याच्यासाठी खास ऑडिओ क्लिपही पाठवली होती. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी राजुच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Raju Srivastav Health Update: 'राजु श्रीवास्तवच्या मेंदूत...' MRI रिपोर्ट समोर

Web Title: Raju Srivastava Health Update Secretary Reaction Viral Social Media Now Actor Recovering

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..