Tulasi Side Effects : तुळशीचे दुष्परिणाम माहिती आहे का? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tulasi Side Effects

Tulasi Side Effects : तुळशीचे दुष्परिणाम माहिती आहेत का? जाणून घ्या

Tulasi Side Effects : तुळशीच धार्मिक महत्त्व आणि आरोग्याचे फायदे याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही ते अनेकदा वाचलही असेल, पण तुळश खाण्यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचू शकते हे माहिती आहे का? रोज तुळस खाल्ल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. आहारतज्ज्ञ म्हणतात की तुळस खाणं चांगलंच आहे पण त्यानेही हेही दुष्परिणाम होऊ शकतात.

गरोदरपणात ठरू शकतं घातक

तुळशीत असलेल्या संयुगामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. म्हणून गर्भवती महिलांनी तुळस कमी खावी असा सल्ला दिला जातो. शक्य असेल तर खाऊच नये.

यकृतासाठी हानिकारक

तुळशीचे जास्त सेवन केल्याने यकृत खराब होते, हृदयाचे ठोके वाढू शकतात किंवा इतरही हृदयाचे आजार होऊ शकतात.

डायबिटीस

तुळशीमुळे रक्तातली साखर कमी व्हायला मदत होत. जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी औषध घेत असाल तर तुळस खाऊ नका; कारण यामुळे तुमच्या रक्तातली साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते.

अतिसार

दररोज जास्त प्रमाणात तुळशीचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे जुलाब, मळमळ यासारख्या समस्यांना सामोर जाव लागू शकते.