Turmeric Detox Water : बॉडी डिटॉक्स करणाऱ्या हळदीचं पाणी रोज पिणं योग्य आहे का? तज्ज्ञ सांगतात l Turmeric Detox Water Should Drink Daily Or Not benefits hazards | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Turmeric Detox Water

Turmeric Detox Water : बॉडी डिटॉक्स करणाऱ्या हळदीचं पाणी रोज पिणं योग्य आहे का? तज्ज्ञ सांगतात...

Turmeric Detox Water Should Drink Daily Or Not : हळदीत अनेक प्रकारचे गुण आहेत. जे तुम्हाला आरोग्य प्रदान करतात. त्यामुळे रोजच्या सेवनात हळद असणे आवश्यक असते. हळद अँटीसेफ्टीक असल्याने अगदी पोटातून किंवा जखमेवर वरूनही हळद लावली तरी तिचा फायदाच होतो. याशिवाय ब्युटी प्रॉडक्ट्समध्येही हळद वापरली जाते.

काही लोकांना प्रत्येक पदार्थात हळद हवीच असते. पण तुम्हाला माहिती आहे का की, याचे अतिरीक्त प्रमाण तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात.

हल्ली सोशल मीडियावर अनेक इन्फ्लूएंसर हळदीचं पाणी पिण्यासाठी सांगतात. लोक त्यांच ऐकून ते पितातही. हळदीचं पाणी बॉडीतून टॉक्सीन्स रिमूव्ह करण्यासाठी मदत करते. पण हे अधिक प्रमाणात झाले तर शरीरासाठी हानिकारक ठरते. प्रत्येक गोष्ट प्रमाणातच घेणं आवश्यक असतं.

जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होत असेल तर याचा अर्थ असा नाही की, ते अधिक प्रमाणात घेतला तर अधिक फायदा होईल. प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात घेतली तरच ती उपयुक्त ठरते. जाणून घेऊया अतिरीक्त प्रमाणात हळदीचे पाणी पिण्याचे दुष्परीणाम आणि घेण्याचे योग्य प्रमाण.

अतिरीक्त प्रमाणात हळदीचे पाणी घेतल्याचे दुष्परीणाम

किडनी स्टोनचा धोका

हळद यूरीनरी ऑक्सालेटचा स्तर वाढवतं. हळदीत करक्यूमिन मीठ (क्षार) कंपाउंड असतो. जो सॉल्युबल ऑक्सलेटमध्ये जास्त असतो. हे ऑक्सलेट स्वतःला कॅल्शियमशी जोडतो आणि इनसॉल्युबल कॅल्शियम ऑक्सालेट बनत. ज्यामुळे किडनी स्टोन होतो. ७५ टक्के किडनी स्टोनचं कारण कॅल्शियम ऑक्सालेट असतं.

भारतीय अन्न पदार्थात तसेही हळदीचे प्रमाण असतेच. त्यामुळे हळद अतिरीक्त घेतली जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

आयर्न शोषून घेण्याची क्षमता कमी होते

जर तुमच्या शरीरात आयर्नची कमी असेल तर लक्षात ठेवा की, हळद या पोषक तत्वाचं शोषण होण्यास अडथळा बनू शकते. पब मेड सेंट्रलनुसार हळदीला जास्त प्रमाणात मिरची, लसूण, पालेभाज्या अशा पदार्थांमध्ये मिक्स केल्याने त्यांची आयर्न पातळी कमी होते. किंवा तुमच्या शरीरात उपलब्द आयर्नचे प्रमाण २० ते ९० टक्के कमी करू शकते.

लो ब्लड शुगर

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या नुसार हळद डायबेटीसचा इलाज आणि कमी करण्यासाठी मदत करू शकते. योग्य प्रमाणातले सेवन ब्लड शुगरच्या वाढत्या स्तराला नियंत्रीत करू शकते. ज्यामुळे डायबेटिस संतुलीत राहते. पण याचं अधिक सेवन ब्लड शुगरची पातळी फारच कमी करू शकते. ज्यामुळे तुम्हाला आरोग्य समस्या होऊ शकतात.

मळमळ, अतिसार आणि डोकेदुखी

काही अभ्यासांमध्ये हळदीच्या साइड इफेक्ट्स विषयी लिहीले आहे. जर कोणी नियमित अधिक प्रमाणात हळद घेत असेल तर त्यांना या साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागतो. हळदीत सर्कूमीन क्षार कंपाउंड असतं जे अधिक प्रमाणात गेल्याने अतिसार, डोक्दुखी, त्वचेवर लाल चट्टे असे साइड इफेक्ट दिसू शकतात.

हळद खाण्याचे योग्य प्रमाण

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार रोज तुमच्या शरीराच्या प्रती पाउंड 1.4 mg (0-3mg प्रती ग्रॅम) हळद खाणे सुरक्षित आहे. जर हळदीचं पाणी तुम्ही डिटॉक्स म्हणून पित असाल तर हळदीच्या प्रमाणावर लक्ष ठेवा. कारण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये आधिच पुरेशी हळद वापरलेली असते. त्यामुळे तुम्ही अतिरीक्त हळद तर सेवन करत नाही ना याची काळजी घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.