Health : वजन कमी करण्याच्या प्रवासात 'हे' 2 ज्यूस करतील मदत; पाहा कोणते.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health news

Health : वजन कमी करण्याच्या प्रवासात 'हे' 2 ज्यूस करतील मदत; पाहा कोणते..

सध्याच्या धावपळीच्या जीवनात निरोगी आणि तंदुरुस्त शरीर असणे गरजेचे असते. यामुळे रोगांपासून आणि काही शारिरीक आणि मानसिक आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत मिळते. परंतु आपल्या रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. मग अशावेळी वाढत्या वजनामुळे आपण हळूहळू आजारांच्या जाळ्यात अडकतो. या समस्येपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सकस आहार घेणे.

सकस आहाराचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या आहारात फळे आणि पालेभाज्यांचे प्रमाण अधिक असा सकस आहार शरीरासाठी गरजेचा असतो असे आहारतज्ज्ञ सांगतात. मात्र जर तुम्हाला या सॅलड्स आणि फळांच्या ज्यूसचा कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला हेल्दी व्हेजिटेबल ज्यूसची रेसिपी सांगणार आहोत. जे तुमचे वजन कमी करण्यासोबतच शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतील.

दूधी आणि बीटाचा रस

साहित्य -

 • दूधी - 100 ग्रॅम

 • बीट - 1 (मध्यम आकाराचे)

 • गाजर - २

 • टोमॅटो - २

 • लिंबू - अर्धा लिंबू

 • पुदीना - 8 ते 10 पाने

 • काळे मीठ - चवीनुसार

हेही वाचा: Personality Developement: निगेटिव्हिटी पासून दूर राहून 'असं' ओळखा तुमच्यातील Hidden Talent

कृती -

दूधी, बीट आणि गाजराते साल काढून एका बाजूला ठेवा. यानंतर या सर्व फळांचे बारीत तुकडे करुन घ्या. टोमॅटोसह सर्व भाज्यांचे मोठे तुकडे करून ज्युसरमध्ये टाकून त्याचा रस तयार करून घ्या. शेवटच्या टप्प्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार काळे मीठ टाका. तुमच्या आरोग्यदायी भाज्यांचा रस तयार आहे. तुम्ही सकाळी किंवा सायंकाळच्या टप्प्यात हा ज्युस पिऊ शकता.

दूधी आणि भोपळ्याचा एकत्र रस

साहित्य -

 • भोपळा - 100 ग्रॅम

 • दूधी - 100 ग्रॅम

 • टोमॅटो - 2

 • गाजर - 2

 • आवळा - 2

 • बीट - 1 (मध्यम आकाराचे)

 • पुदीना - 10 पाने

 • लिंबाचा रस - 1 टीस्पून

 • काळे मीठ - चवीनुसार

हेही वाचा: Relationship : पुरुषांना पटत नाहीत महिलांच्या या गोष्टी; महिलांनी विचार करावा

कृती -

सर्व भाज्या धुवून त्यांची साल काढून घ्या. यानंतर त्यांचे मोठे तुकडे करा. यानंतर चिरलेल्या भाज्या ज्युसरमध्ये टाका. तसेच आवळा आणि पुदिना एकत्रित त्यात टाका. या मिश्रणाचा एक घट्ट रस तयार करून त्यात चवीनुसार लिंबू पिळा आणि काळे मीठ टाका. तुमचा हा हेल्दी ज्यूस तयार आहे. कोणत्याही वेळी तुम्ही हा ज्यूस पिऊ शकता.

Web Title: Two Vegetable Juice Recipe Help To Lose Your Weight Health News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..