Stomach Health | विष्ठेतून जातायत अन्नाचे तुकडे ? असा आहे शरीराला धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stomach Health

Stomach Health : विष्ठेतून जातायत अन्नाचे तुकडे ? असा आहे शरीराला धोका

मुंबई : अन्न पचल्यानंतर जो टाकाऊ पदार्थ शिल्लक राहतो, तो आतड्यांकडे पाठवला जातो. त्यातून पाणी काढून घेऊन सर्व टाकाऊ पदार्थ विष्ठा स्वरूपात बाहेर टाकले जातात.

पण जेव्हा पोट आणि आतडे अन्नातून सर्व जीवनावश्यक वस्तू बाहेर काढून घेतात तरीही अन्नाचे स्वच्छ तुकडे बर्‍याच वेळा विष्ठेत का येतात ? ही पोटाची समस्या आहे, ज्यामुळे पौष्टिकतेची कमतरता म्हणजेच कुपोषण होऊ शकते. हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Ashok Saraf आणि Urfiला झालेला लॅरिन्जायटिस आजार तुम्हाला झाल्यास काय कराल ?

हे अन्न खाल्ल्यानंतर विष्ठेतून अन्न बाहेर पडते

विष्ठेमध्ये अन्नाचे तुकडे येण्यामागे उच्च फायबरयुक्त पदार्थ कारणीभूत असतात. हे पदार्थ पचन नाहीत व तसेच विष्ठेमध्ये येतात. हे सामान्य आहे. कॉर्न, शेंगा, पालेभाज्या, शेंगदाणे इत्यादींमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

समस्या काय ?

जर तुम्हाला विष्ठेत बदल होणे, गॅस, पोट फुगणे, जुलाब, विष्ठेला तीव्र वास, दुखणे आणि विष्ठेत अन्नाचे तुकडे वारंवार जाणे यांसारख्या समस्या येत असतील तर ते अपचनाचे लक्षण आहे. याचा अर्थ पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी उपाय करावे लागतील.

कुपोषण होईल

जेव्हा विष्ठेमध्ये अन्नाचे तुकडे जाण्याची समस्या जास्त होते तेव्हा कुपोषण होऊ शकते. कारण, तुकडे येणे म्हणजे पोट अन्न नीट पचवू शकत नाही आणि शरीराचे पोषण होऊ शकत नाही. यामुळे व्हिटॅमिन बी 12 आणि लोहाची गंभीर कमतरता भासू शकते.

हेही वाचा: Pollution Asthma : दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण थेट फुप्फुसांवर करत आहे आक्रमण

पचन सुधारण्याचे मार्ग

मसालेदार ताक

पचन सुधारण्यासाठी दुपारच्या जेवणात मसालेदार ताक प्या. ते तयार करण्यासाठी १/४ टीस्पून मेथी दाणे, १/२ टीस्पून जिरे आणि चिमूटभर हिंग १/२ टीस्पून तुपात टाकून मंद आचेवर शिजवा आणि नंतर त्यात ताक ओता.

ओवा आणि आल्याचे पाणी

१ लीटर पाण्यात १ चमचा ओवा आणि १ इंच किसलेले आले उकळा. दिवसभर हे कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

टॅग्स :stomachIndigestion