Unusual Signs Of Iron Deficiency: सतत पाय हलवण्याची अनावर इच्छा होतेय? कधीच दुर्लक्ष करू नका! असू शकतो हा प्रॉब्लेम

Iron Deficiency Symptoms You Didn’t Know Could Be So Serious: लोहाची कमतरता असल्याचा संशय येतोय का? सतत पाय हलवण्याची इच्छा, केसगळती यासारखी विचित्र लक्षणं जाणवत असतील तर, लोहाच्या कमतरतेची कारणं, लक्षणं आणि धोके जाणून घ्या.
Unusual Signs of Iron Deficiency
Unusual Signs of Iron Deficiency sakal
Updated on

Symptoms of Iron Deficiency That Are Often Ignored: तुम्हाला नेहमीपेक्षा जरा जास्त थकल्यासारखं वाटतंय? केस गळणं थांबतच नाहीये? झोपताना पाय अस्वस्थ वाटतात का? अशी छोटी आणि साधी वाटणारी लक्षणं कधी कधी शरीरासंबंधी काहीतरी गंभीर सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या रोजच्या धावपळीत ही लक्षणं आपण दुर्लक्षित करतो, पण शरीर मात्र आपल्याला सतत इशारा देत असतं. चला, अशाच काही सामान्य वाटणाऱ्या पण लोहाची कमतरता दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

सुजलेली किंवा वेगवेगळ्या रंगांची जीभ

जेव्हा शरीरातील लोहाची कमतरता खूप वाढते तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या जिभेवर सुद्धा होतो. ज्यामुळे जीभ फुगलेली किंवा वेगवेगळ्या रंगांची दिसू शकते. काहीवेळा जिभेवरील खाचखळगे नाहीसे होऊन ती गुळगुळीत वाटू शकते. डॉक्टर सांगतात ही लक्षणे 'ग्लोसिटिस' किंवा जिभेच्या जळजळीची असू शकतात.

Unusual Signs of Iron Deficiency
Kids Health Alert: कृत्रिम खाद्य रंग मुलांसाठी ठरतोय 'स्लो पाॅइझन'? काळजी घेण्याचे बालरोगतज्ज्ञांचे आवाहन

सतत केस गळणे

लोह हिमोग्लोबिनसाठी गरजेचं असतं. कारण त्याशिवाय आपल्या केसांपर्यंत आवश्यक पोषण आणि प्राणवायू पोहोचत नाही. त्यामुळे केसांची वाढ खुंटते आणि अधिक प्रमाणात केसगळती होऊ शकते. हे पुढे जाऊन अ‍ॅलोपीशिया (केस गळण्याचा आजार) या स्थितीचं रूप घेऊ शकतं.

कानात आवाज येणे

कानात सतत काहीतरी वाजतंय, गुणगुणतंय असं जाणवत असेल तर ते लोहाच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. यालाच टिनिटस असेही म्हणतात. डॉक्टर सांगतात की काही लोकांना यात आपली नाडी किंवा हृदयाचे ठोके कानात ऐकू येतात आणि डोक्यात घोळताना जाणवू शकतात. दुर्दैवाने, एकदा टिनिटस सुरू झालं की, ते कायमचं असण्याची शक्यता असते.

पाय हलवण्याची अनावर इच्छा (रेस्टलेस लेग सिंड्रोम)

रात्री झोपताना पाय सतत हलवावासा वाटतोय? झोपेचं वेळोवेळी खंडित होणं, चिडचिड वाढणं – ही सगळी लक्षणं शरीरात लोहाची कमतरता असल्याचे संकेत असू शकतात. संशोधनातून असं दिसून आलं आहे की लोहाची योग्य मात्रा घेतल्यावर ही लक्षणं कमी होतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

Unusual Signs of Iron Deficiency
साखर-दारूपेक्षाही घातक आहे हा 'सायलेंट किलर'! 15 वर्षांनी करू शकतो आयुष्य कमी

या लोकांना असतो जास्त धोका

प्रामुख्याने स्त्रियांमध्ये लोहाच्या कमतरतेची समस्या साधारण आहे. पण फक्त स्त्रियाच नाही तर लोहाचे सेवन कमी करणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील ही समस्या दिसून येते.

- मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव अनुभवणाऱ्या स्त्रिया

- गरोदर महिला किंवा नुकत्याच बाळंत झालेल्या महिला

- ज्यांची नुकतीच पोटाची मोठी शस्त्रक्रिया झाली आहे

- जी लहान मुले रोज ३० ग्रॅमपेक्षा जास्त गायीचं दूध पितात

- गॅस्ट्रिक बायपास सर्जरी सारख्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत

- ज्यांना पचनाशी संबंधित आजार आहेत, जसे की सेलिएक किंवा इंफ्लेमेटरी बॉवेल डिसीज

- शाकाहारी किंवा कमी लोहाचा आहार करणारे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com