Erectile dysfunction : मायक्रोवेवमध्ये अन्न गरम करणे धोक्याचे; तुम्ही देताय नपुंसकतेला निमंत्रण

झटपट अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव जरी बेस्ट असलं तरी त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येत नाही
Erectile dysfunction
Erectile dysfunctionesakal

Microwave Disadvantages : सहसा गार झालेलं जेवण कोणालाही नकोसं वाटतं. अनेकजण ऑफिसमध्ये लंच ब्रेकच्या वेळी थंड झालेला डबा ऑफिस कँटिनच्या मायक्रोवेवमध्ये गरम करून खातात. मात्र याचा तुमच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आहे काय?

झटपट अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव जरी बेस्ट असलं तरी त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येत नाही. तेव्हा मायक्रोवेवमध्ये अन्न गरम करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ते आपण जाणून घेऊयात.

मायक्रोवेवने गर्भवती महिलांना पोहोचतो जास्त धोका

मायक्रोवेव्हमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (electromagnetic rediation) गर्भवती महिलांना (preganant woman) हानी पोहोचवू शकतात , असे एका संशोधनात (research) सांगण्यात आले आहे. (Health News)

रेग्युलर मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने न जन्मलेल्या बाळाला म्हणजेच पोटात असणाऱ्या बाळाला हानी पोहोचते तसेच गर्भपात होण्याची शक्यता असते. (Pregnant Women) अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रॉडक्टिव्ह हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, प्लास्टिकमध्ये आढळणारे काही पदार्थ अन्नाद्वारे शरीरात जाऊन नुकसान करतात.

वारंवार मायक्रोवेवमध्ये अन्न गरम केल्याने अन्नामधील पोषक घटक नष्ट होतात. याने तुमच्या अन्नातील 60-90 टक्के महत्वाचे घटक नष्ट होतात.

मायक्रोवेवमध्ये अन्न गरम करण्याचे तोटे

  • मायक्रोवेवमध्ये गरम केलेल्या अन्नाची पौष्टिकता कमी झाल्याने त्याचा परिणान तुमच्या इम्युनिटीवरही होतो.

  • यातून निघणारे वेव्ह्स जेवणात कँसरला आमंत्रण देणारे घटक निर्माण करतात.

  • मायक्रोवेवने जेवणात असे बदल घडतात की हे जेवण पचण्यासही जड होते. त्यामुळे पचनसंस्थेशी निगडीत आजार उद्भवतात.

Erectile dysfunction
Men's Health Tips: सायकलिंगदरम्यान केलेली एक चूक ठरू शकते पुरुषांमध्ये नपुंसकतेचं कारण...

चुकूनही प्लास्टिकच्या भांड्यात जेवण गरम करू नये

  • प्लास्टिकच्या भांड्यात जेवण गरम करणे फार धोकादायक ठरते.

  • प्लास्टिकमध्ये Phthalates आणि Bisphenol A नावाची दोन रसायने असतात. काही अहवालानुसार ही दोन्ही रसायने अंतःस्रावी ग्रंथींवर परिणाम करतात.

  • ही रसायने इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन सारख्या हार्मोन्सच्या क्रियांवर देखील परिणाम करतात.

  • WHO म्हणण्यानुसार, मायक्रोवेव्हिंग दरम्यान, प्लास्टिकच्या भांड्यांमधून ही रसायने काही प्रमाणात अन्नामध्ये प्रवेश करू शकतात.

मायक्रोवेवमध्ये जेवण गरम करताना घ्या ही काळजी

  • मायक्रोवेवमध्ये जेवण गरम करताना काचेच्या भांड्याचा वापर करा.

  • प्लास्टिकचे भांडे चुकूनही मायक्रोवेवमध्ये ठेवू नका.

  • मायक्रोवेवमधून गरम केलेले अन्न लगेच प्लास्टिकच्या भांड्यात काढू नका.

  • एखादा पदार्थ प्लॅस्टिकच्या भांड्यात घेऊन फ्रिजमध्ये ठेवला असेल तर मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याआधी ते सिरॅमिक किंवा काचेच्या भांड्यात काढून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com