हेल्थ वेल्थ : दुखापत टाळण्यासाठी...

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे निरोगी पदार्थांचे सेवन आणि दररोजचा व्यायाम आणि वर्कआउट्स.
Health Wealth
Health WealthSakal

- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे निरोगी पदार्थांचे सेवन आणि दररोजचा व्यायाम आणि वर्कआउट्स. तुमच्या दैनंदिन व्यायामामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी महत्त्वाचा मार्ग म्हणजे दुखापतीपासून दूर राहणे.

व्यायाम करताना तुम्हाला दुखापत होण्याची अधिक शक्यता असते, कारण तुम्ही शरीराला अस्वस्थ झोनमध्ये ढकलत असता. मात्र, काही टिप्स आणि सूचना लक्षात घेतल्यास तुम्हाला दुखापतीपासून लांब राहण्यास आणि परिणामी तुमच्या फिटनेस प्रवासात सातत्य ठेवण्यास मदत करतील.

प्रथम आपण वॉर्मअपला प्राधान्य देणार आहोत. वॉर्मअप हा संपूर्ण चित्रपट पाहण्याआधी ट्रेलरसारखेच असते. आपण वॉर्मअप करण्याचे कारण म्हणजे आपल्या शरीराला आपण करत असलेल्या व्यायामाची सवय लावणे. तुम्ही कोणत्याही खेळाडूकडे पाहिल्यास ते खेळ सुरू होण्यापूर्वीच जॉगिंग आणि स्ट्रेचिंग करतात.

तुम्ही व्यायाम करता, उदाहरणार्थ, तुम्ही धावता तेव्हा तुमच्या शरीराला कळते, की तुमचे पाय काम करत आहेत आणि हृदय तुमच्या पायाच्या स्नायूंना अतिरिक्त प्रमाणात रक्तपुरवठा करू लागते. तुम्ही वजन उचलत असाल, तर तुमच्या शरीराला माहीत आहे की हातांना थोडे जास्त रक्त लागेल आणि हृदय कामाला लागते. वॉर्म अप शरीराला थोडासा इशारा देते, की कोणत्या स्नायूंना अतिरिक्त प्रमाणात रक्त आवश्यक आहे.

यामुळे हृदयाला हळूहळू गतीने धडधडायला आणि स्नायूंना हे रक्त पंप करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. आपण वॉर्मअप टाळले आणि थेट तीव्र वर्कआउटमध्ये उडी घेतल्यास शरीर आणि हृदयाला धक्का बसतो, ज्यामुळे हृदयावर ताण वाढतो व तो चांगला नसतो. वॉर्मअप न केल्याने ऊर्जेची बचत होण्याऐवजी कार्यक्षमता कमी होते.

हृदयावर लक्ष ठेवा

एकदा वॉर्मअप झाल्यावर आणि व्यायाम सुरू केल्यानंतर, तुमच्या फॉर्मवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे, तर त्यातून उत्तम परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला कोणताही व्यायाम करताना योग्य पवित्रा राखावा लागेल.

एक उदाहरण म्हणून धावणे किंवा चालणे घेऊ. तुमचे डोके उंच ठेवणे, तुमचे खांदे मागे वळवणे, तुमचे हात आत अडकवणे, तुमचे पाय तुमच्या शरीराजवळ येणे आणि तुम्ही साधारण ८० ते ९० मीटर पुढे बघणे महत्त्वाचे आहे. हे सर्वच प्रकारच्या व्यायामासाठी महत्त्वाचे आहे.

तुमचा फॉर्म योग्यरीत्या मिळवणे महत्त्वाचे आहे आणि ते करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे, जो तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये सुधारणा करण्यासाठी गरजेच्या बारीक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करू शकेल. दुसरा मार्ग म्हणजे इंटरनेटवर शोधणे आणि तुमच्या फॉर्मवर तुम्हाला सल्ला देऊ शकतील अशा विश्वसनीय स्रोतांकडून माहिती मिळवणे.

ओव्हरट्रेन होऊ नका

व्यायाम म्हणजे तुमच्या शरीराला कम्फर्ट झोनच्या बाहेर थोडेसे ढकलणे. यामुळे शरीर आणि स्नायू पुनर्बांधणीसाठी कार्य करतात, अधिक मजबूत होतात. मात्र, आपण मर्यादा ओलांडल्यास शरीराला कमी वेळेत पुनर्बांधणी आणि दुरुस्त करण्याच्या कामात व्यत्यय आणतो. यालाच दुखापत म्हणतात.

हे टाळण्याचा एक मार्ग म्हणजे खूप वेळा, अतिरिक्त तणावाचे व्यायाम टाळणे. शरीराला पुरेशी विश्रांती देणेही गरजेचे आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे आपली झोप पूर्ण होत नाही. परिणामी सहसा आपले शरीर बरे होऊ शकत नाही आणि पुढच्या वेळी आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्याला दुखापत होण्याची अधिक शक्यता असते.

आपण हे समजून घेतले पाहिजे, की पुरेसा सराव आणि अनुभवाशिवाय आपण कोणत्याही प्रगत वर्कआउटवर जाऊ नये. तसे केल्यास आपल्याला दुखापत होण्याची शक्यता वाढते.

पोषण गरजेचे

शेवटी, आपण आपल्या पोषणाची काळजी घेण्याच्या मार्गावर येतो. आपण व्यायाम करताना शरीराचे काही प्रमाणात नुकसान करत असतो. त्यानंतर आपले शरीर स्वतःला बरे करते आणि परिणामी, ते मजबूत होते. या किरकोळ नुकसानांपासून स्वतःला बरे करण्यासाठी, शरीराला पुरेसे पोषण आवश्यक आहे.

वर्कआउट पूर्ण करण्याची ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते. व्यायामानंतर पुनर्बांधणीची प्रक्रिया देखील अन्नाद्वारे चालते. चिकन, अंड्याचा पांढरा भाग, दुग्धजन्य पदार्थ, शेंगा, कडधान्ये, हिरवे वाटाणे यासारखे खाद्यपदार्थ यात मदत करतात. व्हिटॅमिन डी आपली हाडे आणि सांधे निरोगी आणि मजबूत ठेवतो.

मात्र, आपण खात असलेल्या अन्नातून व्हिटॅमिन डी सहज उपलब्ध होत नाही. आणि आपण जी वेगवान जीवनशैली जगतो, त्याकडे पाहता आपल्या पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याचीही खात्री नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डीच्या गरजा सप्लिमेंट्सद्वारे पूर्ण केल्या पाहिजेत.

त्याचप्रमाणे, व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. आवळा त्याचा सर्वोत्तम स्रोत आहे. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या स्नायूंच्या दुरुस्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. ब्रोकोली, पालक, मेथी, लेट्यूस, राजगिरा ही अशा भाज्यांची काही उदाहरणे आहेत.

या टिप्स तुम्हाला दुखापतींपासून दूर राहण्यास मदत करतील आणि सुदृढ आणि फिट राहण्याची इच्छा पूर्ण करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com