
How to Build Financial Wellness Using Smart Spending Habits: दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. 7 एप्रिल 1948 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ची स्थापना झाली आणि त्यानंतर जागतिक आरोग्य दिन साजरा करायला सुरूवात झाली. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे आणि सर्वांसाठी आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
शारीरिक आरोग्याप्रमाणेच आर्थिक स्वास्थ्यासाठीही काळजी घेणे आणि स्मार्ट सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त, व्हिसा तुम्हाला खर्च करताना अधिक सजग राहण्यासाठी तसेच तुमच्या कार्ड्सचा सुरक्षित आणि प्रभावी वापर करून एक चांगले आर्थिक भविष्य घडवण्यासाठी काही सोप्या आणि उपयुक्त टिप्स देत आहे. हे उपाय केवळ खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत करत नाहीत, तर सुरक्षित आणि स्मार्ट आर्थिक भविष्यासाठी मार्गदर्शकही ठरू शकतात.
खर्च करण्यासोबत क्रेडिट क्षमता वाढवा
दैनंदिन खरेदींसाठी जबाबदारपणे विविध क्रेडिट कार्डस् ऑप्टिमाइज करत आणि दर महिन्याला थकबाकी भरत प्रबळ क्रेडिट हिस्ट्री स्थापित करा. कर्ज किंवा सर्वोत्तम व्याजदर आवश्यक असताना ही सवय फायदेशीर ठरते.
सुरक्षित पेमेंट्ससह सुरक्षा जाळे निर्माण करा
तुमचे व्हिसा कार्ड पेमेंट अॅप्सशी लिंक करा, ज्यामुळे एन्क्रिप्शन (Encryption) आणि 2 एफए अशा प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्यांसह तुमच्या प्रत्येक व्यवहाराचे संरक्षण होईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने खरेदी करू शकता.
खर्च करण्याच्या मर्यादांवर नियंत्रण ठेवा
तुमच्या कार्डसवर व्यवहार मर्यादा स्थापित करत बजेटमध्ये राहा. कार्ड कंट्रोल वैशिष्ट्ये तुम्हाला खर्च करण्याच्या मर्यादा व चॅनेल्स कस्टमाइज करण्यास मदत करतात, ज्यामुळे अतिरिक्त खरेदींना प्रतिबंध होऊ शकतो.
प्रत्येक खरेदीमधून अधिक मूल्य मिळवा
दैनंदिन खर्च किंवा प्रवासावर ऑफर्स, रिवॉर्डस्, कॅशबॅक व सूट, विशेष फायदे अशा सुविधांचा फायदा घेत तुमच्या कार्डच्या माध्यमातून स्मार्टपणे खर्च करा.
ऑटोपेसह पेमेंट करायला कधीच चुकू नका
तुमच्या व्हिसा कार्डमधून ऑटोमॅटिक बिल पेमेंट्स सेट करत विलंब शुल्क टाळा आणि क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा. हा तुमचे युटिलिटीज, सबस्क्रिप्शन्स आणि इतर नियमित खर्च यासाठी वेळेवर देय भरले जाण्याच्या खात्रीसाठी प्रभावी मार्ग आहे.
व्हिसाने दिलेल्या या स्मार्ट टिप्स केवळ आर्थिक शिस्त लावण्यासाठीच नाहीत, तर दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी देखील मार्गदर्शक ठरतात. आरोग्यदिना निमित्त शारीरिक व मानसिक आरोग्यासोबतच आर्थिक आरोग्याकडेही लक्ष देण्याची ही योग्य वेळ आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.