'व्हिटॅमिन डी'ची कमतरता ठरु शकते कॅन्सरचे कारण! नैसर्गिकरित्या कसं मिळवाल? जाणून घ्या

Vitamin D Deficiency : 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे शरीरातील पोषक तत्वांचा अभाव ही एक सामान्य समस्या आहे.
Vitamin D
Vitamin D

Health Alert: 'व्हिटॅमिन डी'ची शरीरातील कमतरता अनेक लोकांमध्ये जाणवते. 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे शरीरातील पोषक तत्वांचा अभाव ही एक सामान्य समस्या आहे. सर्वसाधारणपणे ६५ वर्षांपुढील व्यक्ती किंवा ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे अशा लोकांमध्ये व्हिटॅमिनची कमतरता प्रामुख्याने जाणवते. पण, याचा अभाव कोणामध्येही आढळून येतो. जगातील १३ टक्के लोकांमध्ये 'व्हिटॅमिन डी'चा अभाव आढळून आला आहे.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे विविध प्रकारच्या कॅन्सरला निमंत्रण मिळते असं विविध अभ्यासातून दिसून आलं आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्तनाचा, आतड्यांचा किंवा अंडाशयासंबंधी कॅन्सर होण्याचा धोका असतो. संशोधनानुसार, व्हिटॅमिन डी३ आणि कॅल्शियमच्या सेवनामुळे रजोनिवृत्ती झालेल्या महिलेमधील कॅन्सरचा धोका कमी होत नाही.

Vitamin D
Horlicks: हॉर्लिक्स हेल्थ ड्रिंक श्रेणीतून बाहेर; हिंदुस्तान युनिलिव्हरने का केला बदल?

'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेची लक्षणे काय?

व्हिटॅमिन डी हा मेद विरघळवणारा व्हिटॅमिन आहे. कॅल्सियमच्या शोषणाचे काम हे व्हिटॅमिन करते. त्यामुळे शरीराची कार्यप्रणाली सुरळीत चालते. हाडं आणि सांधे दुखी, फ्रॅक्चर, स्नायू पेटके, ऑस्टिओपोरोसिस, थकवा, मूड स्विंग अशा समस्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जाणवतात

तज्ज्ञांनुसार, कॅन्सरच्या सेल्सचे विभाजन होण्यापासून रोखण्यासाठी व्हिटॅमिन डी फायद्याचे ठरते. व्हिटॅमिन डीमुळे सेल्सची निर्मिती कमी होते. त्यामुळे कॅन्सरचा प्रसार देखील कमी गतीने होतो. व्हिटॅमिन तुमच्या केवळ हाडांची काळजी घेत नाही तर खराब जिन्स सुधारण्याचं काम देखील करते. खराब जिन्समुळे कँसरचा धोका वाढतो.

Vitamin D
Summer Health Care : बदलत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम; कडक ऊन अन् अवकाळी पावसाने रुग्णांच्या संख्येत वाढ

तसं पाहिलं तर व्हिटॅमिन डी आणि कॅन्सरमधील संबंध जटिल आहे, संशोधन अद्याप सुरु आहे. पण, सध्याच्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन डीची पातळी संतुलित ठेवल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

व्हिटॅमिन डीची पातळी कशी वाढवायची?

उन्हामध्ये जास्त काळ घालवून तुम्ही मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी घेऊ शकता. काही खास अन्न आणि मशरुम खाल्ल्याने देखील फायदा होतो. सीफूड आणि माशे हे व्हिटॅमिन डी चे प्रमुख स्रोत आहेत. सीफूडमध्ये टूना, मॅकरेल, ऑयस्टर, स्रिम्प यांच्या सेवनामुळे व्हिटॅमिन डी मिळेल. अंड्याचा बलक देखील व्हिटॅमिन डीने भरपूर असतो. याशिवाय, गाईचे दूध, संत्र्याचा रस, दही यातून व्हिटॅमिन डी मिळते. यू.एस. नॅशनल अकॅडमी मेडिसिननुसार, ६००-७०० IU दररोज घेतलेले व्हिटॅमिन डी शरीरारासाठी पुरेसे असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com