Weight Loss and Cancer: वाढणारा लठ्ठपणा योग्य वेळी अशा पद्धतीने रोखा, नाहीतर वाढेल कर्करोगाचा धोका!

अतिरिक्त वजन आणि लठ्ठपणामुळे 13 प्रकारचे कर्करोग होण्याची जोखीम असते.
Weight Loss and Cancer
Weight Loss and CancerEsakal

Weight Loss to Reduce Cancer Risk: लठ्ठपणा ही आता एक सामान्य समस्या बनत चालली आहे. आपल्या आजूबाजूला वजन नियंत्रणात नसलेल्या अनेक व्यक्ती आपण पाहत असतो आणि या समस्येकडे आपण तितकं गांभीर्यानं लक्ष देत नाही. पण लठ्ठपणा हा अनेक आजार होण्यामध्ये जोखमीचा घटक ठरत आहे. कर्करोग त्यापैकी एक आहे.

अतिरिक्त वजन आणि लठ्ठपणामुळे 13 प्रकारचे कर्करोग होण्याची जोखीम असते. यामध्ये शरीरातील चरबीमुळे आतडे, यकृत, पोट, कोलोरेक्टल, स्तनाचा, गर्भाशयाचा, अन्ननलिका, मूत्रपिंड, अंडाशय, थायरॉइड, मल्टीपल मायलोमा, मेंदू आणि स्वादुपिंड यासारख्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.लठ्ठपणा ही समस्या भारतात लक्षणीयरित्या वाढत असून त्याचा विपरीत परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर होत आहे. लठ्ठपणा आणि स्थूलता म्हणजे फक्त वाढलेलं वजन नव्हे तर इतर अनेक रोगांना आमंत्रण आहे, हे तज्ज्ञ आपल्याला वारंवार सांगत आहेत. याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे.

Weight Loss and Cancer
Natural Hair Care: चमकदार व मऊ केसांसाठी बीटापासुन तयार करा घरच्या घरी नॅचरल हेअर कलर

चुकीची जीवनशैली, ताणताणाव, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, टीव्ही आणि मोबाइलचा वाढता वापर, साखरयुक्त पदार्थांचं वाढतं सेवन यामुळे फक्त प्रौढांमध्येच नव्हे तर लठ्ठपणा हा लहान मुलांमध्येसुद्धा दिसून येऊ लागला आहे. लठ्ठपणा हा केवळ शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागात देखील वाढत चालला आहे. 

कर्करोगासह अनेक व्याधींची जोखीम कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं. सर्वसाधारणपणे लठ्ठपणा जाणून घेण्यासाठी व्यक्ती आणि उंचीचं गुणोत्तर अर्थात 'बॉडी मास इंडेक्स'वरून एखादा माणूस लठ्ठ आहे की नाही ते ठरतं. हा बीएमआय व्यक्तीचा बीएमआय= किलोग्रॅममधील वजन भागिले मीटरमधील उंचीचा वर्ग असा काढायचा असतो. पण साधारणत: 18.5 ते 24.9 हा बीएमआय योग्य मानला जातो. 24 ते 29.5 बीएमआय जास्त वजन मानलं जातं आणि 30 च्यावर बीएमआय असेल तर लठ्ठपणाचं लक्षण असतं.

Weight Loss and Cancer
Food in Fridge : फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य?

Weight Loss Tips: वजन कमी करण्याच्या काही टिप्स

1) लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस खाऊ नका.

2) दारू पिणे बंद करा.

3) दैनंदिन आहारातील मीठाचे प्रमाण कमी करा.

4) सप्लीमेंट पदार्थांऐवजी सकस पौष्टिक अन्न खावे.

5) नवजात बाळाला पुरेसे आईचे दूध द्यावे.

6) फास्ट फूड, चिप्स, मिठाई, शितपेय या गोष्टीचे अतिरिक्त सेवन टाळावे.

7) दररोज नियमितपणे 30 मिनटे शतपावली करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com