Weight Loss: अति जास्त वेळ व्यायाम करणं खरचं धोक्याचं असतं का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss

Weight Loss: अति जास्त वेळ व्यायाम करणं खरचं धोक्याचं असतं का?

कोरोना काळानंतर शहरी भागात तसेच ग्रामीण भागात लोकांमध्ये फिटनेसची क्रेझ अगदी झपाट्याने वाढली आहे. रोगप्रतिकारकशक्ती उत्तम ठेवण्याचा मार्ग म्हणजे फिटनेस हे एक समीकरणच लोकांच्या डोक्यात फिक्स झालं आहे .त्यामुळे म्हणून प्रत्येकजण व्यायम करण्याच्या मागे लागला आणि ज्यांना शक्य होतं असे सगळचे लोक जीमला जाऊ लागले आहे.

जिममध्ये गेल्यानंतर बहुतेक लोक हे तासन् तास व्यायाम करतात. निरोगी आणि तंदुरूस्त शरीरासाठी व्यायाम करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे हा हानिकारक ठरू शकतो. तासन् तास व्यायाम केल्याने ब्रेन हॅमरेज आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे नेमका किती वेळ व्यायाम करावा ,जास्त व्यायाम केल्याने काय धोके निर्माण होऊ शकतात या सगळयांची सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

हेही वाचा: Health: उत्तम आरोग्य आणि उत्तम चव देणारे नाचणीचे लाडू कसे तयार करायचे?

● अति जास्त व्यायाम केल्याने कोणते धोके निर्माण होऊ शकतात?

अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे की, हार्डकोर व्यायामामुळे हृदयाचे ठोके अचानक बंद होतात. काही वेळा अति जास्त व्यायाम केल्याने मेंदूला रक्तस्त्राव होऊ शकतो. काही वेळा खूप जास्त व्यायाम केल्याने कार्डियाक अरेस्ट (SCA) आणि ब्रेन हॅमरेजचा धोकाही वाढतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढाच व्यायाम करावा.आणि व्यायाम हा चुकीच्या पद्धतीने करु नये.

● हार्डकोर व्यायाम नेमका किती वेळ करावा?

या संदर्भात तज्ञ असा सल्ला देतात की, सर्वसामान्य लोकांनी हार्डकोर व्यायाम करणे टाळावे. फिट राहण्यासाठी दिवसातून कमीत कमी 20 ते 25 मिनिटं व्यायाम करणे पुरेसे आहे. जितका हलका तुम्ही व्यायाम कराल तितकं तुमचं शरीर निरोगी राहील. हार्डकोर वर्कआऊट खेळाडूंनी करावा, असे तज्ञांचे म्हणणे आहे.


● आठवड्यातून किती दिवस व्यायाम करणे गरजेच आहे?

शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी खरंतर रोजच व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र, शरीरावर तेवढाच व्यायाम टाकला पाहिजे जेवढं शरीर सहन करू शकेल.आठवड्यातून फक्त पाच दिवस व्यायाम केल्यास फायदा होऊ शकतो. फिटनेससाठी अर्धा तास व्यायाम करणे पुरेसे आहे. या जीवनशैलीमुळे पॅरालाईझ, मधुमेह, हायपरटेन्शन आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

Web Title: Weight Loss Is It Really Dangerous To Exercise For Too Long

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..