Weight Loss Journey
Weight Loss Journeyesakal

Weight Loss Journey : प्रथमेशने घरीच कमी केलं १४ किलो वजन, 'या' आयुर्वेदिक उपायांमध्ये आहे सिक्रेट

सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटेचा फिटनेस जर्नी तुमच्यासाठीही ठरू शकतो प्रेरणादायी.
Published on

Prathamesh Laghate Fitness Journey : मराठी रिअॅलिटी शोज मधला लोकप्रिय शो असलेल्या सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटेमध्ये अलिकडच्या काळात बराच बदल बघायला मिळत आहे. सध्या त्याच्या आणि मुग्धा वैशंपायन हिच्या लग्नाची चर्चा सगळीकडे जोरात सुरू आहे. अशात त्यांच्याविषयी जाणून घेण्यात लोकांना बराच इंटरेस्ट असतो.

सध्या प्रथमेश बराच बारीक दिसत आहे. त्याने काही महिन्यात १४ किलो वजन कमी केलं आहे. त्याच्या या जर्नीविषयी त्याने सांगितलं. जाणून घेऊया.

प्रथमेश खूप खवय्या आहे. पण त्याबरोबरच तो आहाराची फार काळजीही घेतो. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश आणि मुग्धाने एकत्र फोटो पोस्ट करत आमचं जमलं असं सांगितलं. त्यानंतर सगळीकडे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून मुलाखतीही देत आहेत. त्यातच आयुष्यावर भरभरून बोलताना राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने वजन कमी कसं केलं ते सांगितलं आहे.

Weight Loss Journey
Weightloss Journey : ना डाएट, ना जीम तरीही 10 महिन्यात केलं ५२ किलो वजन कमी...

डाएट

त्याने सांगितलं तो पूर्ण डाएट पाळतो. त्याचं डाएट आयुर्वेदिक पद्धतीचं आहे. आयुर्वेदात दिनश्चर्या आणि ऋतूचर्या अशा दोन व्याख्या आहेत. त्यानुसार तो आहारात बदल करत असतो. त्यानं मैदा खाणं बंद केलं आहे. शिवाय रात्री उशीरा जेवणंही टाळतो. कधीकधी गाण्याच्या कार्यक्रमाने त्याला उशीर होतो आणि गायल्याने चांगलीच भूक लागलेली असते. अशावेळी तो उपमा किंवा खिचडीसारखे हलके अन्न खातो.

Weight Loss Journey
Weightloss Tips : हे 4 ड्रिंक्स करतील लठ्ठपणा झटपट कमी, ट्राय करा

व्यायाम

व्यायामाविषयी सांगताना तो म्हणाला तो कधीच जीमला जात नाही. तो पारंपरीक व्यायम म्हणजे सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, चालणे, प्राणायाम असे व्यायाम प्रकार करतो. त्या भाऊ एमडी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांनी त्याला वेटलॉस रुटीन प्लॅन करून दिलं आहे. त्याच्यासारखच डाएट मुग्धाही फॉलो करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com