
Charitable Hospitals: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळं एका गर्भवती महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी आहे. हे रुग्णालय चॅरिटेबल ट्रस्ट अर्थात धर्मादाय रुग्णालय असतानाही असा लाजीरवाणा प्रकार इथं घडल्यानं संताप व्यक्त होत आहे. पण शासनाची ही धर्मादाय रुग्णालय योजना नेमकी काय आहे? यामध्ये कोणाला मोफत आणि सवलतीत उपचार मिळू शकतात? हे माहिती असणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात या योजनेबाबत सविस्तर.