Nasal Vaccine : काय आहे नेझल व्हॅक्सीन अन् कसं काम करते? जाणून घ्या...

जगात सर्वप्रथम भारतानेच नेझल व्हॅक्सीनला परवानगी दिली आहे. आता नाकात स्प्रे करून कोरोनाविरुध्द वॅक्सीनेशन केलं जाणार आहे.
Nasal Vaccine
Nasal Vaccineesakal

What Is Nasal Vaccin And How It Works : जगात सर्वप्रथम भारतानेच नेझल व्हॅक्सीनला परवानगी दिली आहे. आता नाकात स्प्रे करून कोरोनाविरुध्द वॅक्सीनेशन केलं जाणार आहे. त्यामुळे इंजेक्शनची भीती वाटणारे लोकही हे व्हॅक्सीन सहज घेऊ शकतात आणि यासाठी फार तज्ज्ञ लोकांचीही आवश्यकता भासणार नाही. पटापट व्हॅक्सीन दिले जाईल. यामुळे व्हायरस शरीरात जाण्यापासून रोखेल आणि आजारपण येण्यापासूनही वाचवेल. यामुळे आरटीपीसीआर फॉल्स पॉझिटीव्ह होण्याचे केसेस कमी होतील असा विश्वास वर्तवण्यात आला आहे.

काय आहे नेझल व्हॅक्सीन

हैद्राबादच्या भारत बायोटेक कंपनी ज्यांनी कोव्हॅक्सीन बनवली त्यांनीच वॉशिंगटन यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडीसीन (WUSM) सोबत मिळून हे नेझल व्हॅक्सीन बनवलं आहे. या नेझल व्हॅक्सीनचं नाव iNCOVACC असं आहे. याची खासियत म्हणजे हे शरीरात जाताच कोरोना इंफेक्शन आणि ट्रांसमिशन दोन्हीही थांबवू शकेल.

Nasal Vaccine
Nasal Vaccine Price : नेझल व्हॅक्सिनच्या किंमतीबाबत मोठी अपडेट; मोजावे लागणार इतके पैसे

काय आहेत फायदे

 • साधारणतः व्हॅक्सीनसाठी इंजेक्शन दिलं जातं. जे तुमच्या मसल्समध्ये दिलं जातं. त्याला इंस्ट्रामस्क्युलर व्हॅक्सीन म्हटलं जातं.

 • हे नाकात स्प्रे द्वारे दिलं जातं त्यामुळे या इंट्रानेझल व्हॅक्सीन म्हणतात. यात इंजक्शनची गरज नाही.

 • यासाठी हेल्थकेअरला ट्रेनिंग देण्याची आवश्यकता नाही.

 • व्हॅक्सीन कमी होण्याची शक्यताही कमी असते.

 • इंजेक्शनचा खर्च आणि वेळ पण वाचेल. मेडीकल खर्च कमी होईल.

 • व्हॅक्सीनेशन स्वस्त होण्याची शक्यता वाढते.

 • आवश्यकता वाटल्यास हे व्हॅक्सीन लहान मुलांनाही देता येईल.

Nasal Vaccine
Nasal vaccine : नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला सरकारची मान्यता; आजपासून लसीकरणाला सुरुवात

ही लस कसं काम करते?

लस दिल्यावर ती पहिले नाक, घसा, नाकाच्या मागचा भाग, म्यूकोजा इत्यादी मध्ये अँटीबॉडीज बनवतं. याला IgA अँटाबॉडीज म्हणतात. आधीच्या लशी मसल्समध्ये दिल्या जात असल्याने त्यातून या अँटीबॉडीज बनत नसत. या नेझल लशीने अँटाबॉडीज नाकाच्या आजूबाजूला वायरस जमा होऊ देत नाही. शिवाय याचा संदेश लिंफ्यॉड सेल शरीरातल्या इतर अवयवांनाही देत असल्याने तिथेही IgG आणि IgM अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे ही लस जास्त प्रभावी आहे.

Nasal Vaccine
Nasal Vaccine : भारत बायोटेक आणणार पहिली नेझल कोविड लस; पण अद्याप 'हा' डेटाच उपलब्ध नाही!

बुस्टर डोसचं काम

ही लस इमिडीएट आणि लाँगटर्म अँटाबॉडीज बनवतात. ही लस घेतल्याने ६ ते ९ महिने ७२ टक्के लोकांमध्ये असरदार ठरते. कोव्हॅक्सीनचा कालावधी पण एवढाच होता. त्यानंतर अँटीबॉडीजची लेव्हल कमी होऊ लागते. पण अँटीबॉडीज संपत नाहीत. अँटीबॉडी मेमरी सेलमध्ये जाऊन पडून राहतो. जेव्हा तुम्हाला बुस्टर डोस मिळतो तेव्हा त्या पुन्हा क्रीयाशील होतात.

धोका

 • ही लस नाकाच्या अगदी जवळ वॉयल नेवून दिली जाते. त्यामुळे कोणाला जर आधीच काही इंफेक्शन असेल तर त्याचं एकमेकांना इंफेक्शन होण्याचा धोका आहे.

 • सामान्यतः एका वॉयलमध्ये १० डोस जाऊ शकतात.

 • जर सिंगल डोस बनवला गेला तर धोका नाही.

 • त्यासाठी जर एक कंटेनर असेल तर दर वेळी स्प्रे कीट बदलणं आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com