कोरोना व्हायरसचा कहर झेलल्यानंतर अनेक आजार डोकी वर काढत आहेत. ज्यांची नावेही कधी ऐकली नाहीत असे आजार आपल्याला होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे की, कोरोनानंतर अनेक आजार पसरू शकतो. त्यामुळे जग भितीच्या छायेखाली आहे.
अशातच, युगांडामध्ये एका नव्या व्हायरसने थैमान घातलं आहे. युगांडामधील लोक सध्या चालता – चालता थिरकत आहेत. म्हणजे डान्स करत आहेत. कारण अशा गंभीर आजाराची त्यांना लागण होत आहे. गरिबी आणि दारिद्र्याला वैतागलेल्या युगांडाच्या (Uganda) बुंडीबुग्यो जिल्ह्यात लोकांना आता या नव्या संकटाला सामोरे जात आहेत.