Vaccination For Pregnant Women: सावधान! गरोदर महिलांनी चुकूनही घेऊ नये या 6 लसी

गरोदर पणात प्रकारची काळजी घ्यावी लागते, सगळेच अनुभव नवखे असतात.
Vaccination For Pregnant Women
Vaccination For Pregnant Womenesakal

Vaccination For Pregnant Women: गरोदर पणात प्रकारची काळजी घ्यावी लागते, सगळेच अनुभव नवखे असतात. गर्भधारणा ही अशी वेळ आहे जेव्हा एखादी स्त्री पहिल्यांदा आई होणार असते. तिच्या न जन्मलेल्या मुलाशी जोडते. हा खूप आनंददायी अनुभव आहे. अशात सतत मेडिकल चेकअप साठी जाणे गरजेचं असतं, आजूबाजूचे लोकही हे करा ते करु नका असं सगळं सांगत असतात.

पण नक्की काय करावं काय करु नये याबाबत खूप संभ्रम असतो, अशात या लस घेऊ नका असा सल्ला डॉक्टर देतात. तरीही कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा.

1. एमएमआर लस

तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला MMR लस घेऊ नये. जर त्याची खूप गरज असेल, तर आधी आपल्या डॉक्टरांशी त्याच्या दुष्परिणामांची चर्चा करा. यामुळे इंजेक्शनच्या ठिकाणी पुरळ, ताप आणि वेदना होऊ शकतात.

2. चिकनपॉक्स लस

चिकनपॉक्स लसीमुळे साइड इफेक्ट्स होऊ शकतात जसे की इंजेक्शनच्या जागेवर वेदना, बारीक पुरळ, स्नायू दुखणे आणि कडक होणे. त्यामुळे गरोदरपणात या लसीची नितांत गरज असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती करुन घेऊ नका.

Vaccination For Pregnant Women
Vastu Tips for Pregnant Women: गर्भवती महिलेची रुम नेमकी कशी असावी?

3. मम्प्सची लस

हा आजार विषाणूमुळे होतो. या विषाणूच्या संसर्गाचा परिणाम चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या ग्रंथींवर होतो. ग्रंथीमध्ये सूज आल्याने खूप वेदना होऊ शकतात.

4. Bacillus Calmette Guérin

BCG लस टीबी विरुद्ध वापरली जाते. गर्भवती महिलांनी ही लस घेऊ नये, इंजेक्शनच्या ठिकाणी सूज आणि स्त्राव सोबतच खूप ताप, डोकेदुखी आणि सूज ग्रंथी येऊ शकतात.

Vaccination For Pregnant Women
Pregnant Women : गरोदर महिलांना कधीच विचारू नयेत हे प्रश्न

5. गोवर

गोवर लस गरोदर महिलांसाठी धोकादायक ठरु शकते. यामुळे पोटातल्या बाळाला त्रास होऊ शकतो. कांजण्या सुद्धा संसर्गजन्य रोग आहे, तापासोबत शरीरावर पुरळ उठू शकते. म्हणूनच तुम्ही ही लस घेऊ नये.

अशा लस घेऊ नका

तुम्ही गर्भधारणेदरम्यान अशी कोणतीही लस घेऊ नये, ज्यामध्ये जिवंत विषाणू असतील. यामुळेच गेल्या तीन वर्षांत कोविड 19 महामारीच्या काळातही गर्भवती महिलांना कोविडची लस दिली गेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com