Bird Flu : आता माणसांनाही बर्ड फ्लूचा धोका, WHO ने दिली धोक्याची घंटा l WHO Alert About Bird Flu In Human southern cambodia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bird Flu

Bird Flu : आता माणसांनाही बर्ड फ्लूचा धोका, WHO ने दिली धोक्याची घंटा

WHO Alert About Bird Flu In Human : दक्षिण कंबोडियाच्या आरोग्य मंत्रालयानुसार तेथील प्री वेंग प्रांतच्या ११ वर्षिय मुलीला ताप, खोकला आणि घशात खवखवणे असे लक्षणं दिसले. त्यानंतर काही दिवसातच H5N1 बर्ड फ्लू व्हायरसमुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या १२ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. तिचे वडिल एच5एन1 मानव एवियन इन्फ्लूएंजाने संक्रमित असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे हा व्हायरस माणसाकडून माणसांमध्ये संक्रमित होण्याचा धोका वाढला आहे. याच व्हायरसमुळे त्या पिडीत मुलीचा मृत्यू झाला.

WHO ने व्यक्त केली चिंता

ही बाब चिंताजनक असल्याचे WHO ने सांगितलं आहे. संस्था यासंदर्भात कंबोडियाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. संस्थेने सांगितलं की, माणसांना हा आजार क्वचितच होऊ शकतो. हा आजार होण्याचं कारण संक्रमित पक्षांच्या थेट संपर्कात येण्याच आहे. आता कंबोडियाचे निरिक्षक हे तपासत आहेत की, हे दोघे बाप लेक संक्रमीत पक्षांच्या संपर्कात आले होते का? त्याद्वारेच हे समजू शकेल की ही व्हायरस माणसाकडू माणसात संक्रमित झाला आहे की, नाही. त्यामुळे आताच निष्कर्षापर्यंत पोहचणं धोक्याचं ठरेल.

जगभरात पक्षांमध्ये व्यापकपणे व्हायरसचा प्रसार आणि मनुष्यासहित अन्य सस्तन प्राण्यांमध्ये वाढते संक्रमण लक्षात घेऊन वैश्विक H5N1 ची स्थिती चिंताजनक आहे.

काळजी घेण्याची आवाहन

WHOने या व्हायरसच्या संसर्गाला गांभीर्याने घेतले असून सर्व देशांना याविषयी जागरुकता वाढवण्याचं आवाहन केलं आहे. आजवर माणसांमध्ये बर्ड फ्लूच्या केसेस फार कमी होत्या, पण शक्यता बऱ्याच प्रमाणात असल्याने याविषयी काळजी घेणं आवश्यक आहे.

माणसांसाठीदेखील धोकादायक व्हायरस

बर्ड फ्लू हा असा रोग आहे जो फक्त पक्षांसाठीच नाही तर जनावरे आणि माणसासाठीही धोकादायक आहे. संसर्गित पक्षांच्या संपर्कात येणाऱ्या प्राण्यांना, माणसांना हा आजार पटकन होतो. यामुळे मृत्यूही होतो.

माणसाला याचा संसर्ग कसा होतो?

बर्ड फ्लूला एवियन इंफ्लूएंजा नावानेही ओळखलं जातं. हा संसर्गजन्य आजार आहे. बर्ड फ्लू बऱ्याच प्रकारचे असतात पण H5N1हा पहिला असा बर्ड फ्लू व्हायरस होता ज्याचा संसर्ग माणसाला झाला. याची पहिली केस 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये निघाली होती. याची सगळ्यात पहिली माहिती 1996 मध्ये चीनमध्येच समजली होती. हा व्हायरस संक्रमीत पक्षाच्या विष्ठेतून, लाळीतून, नाकातून निघणारा स्राव किंवा डोळ्यात वाहणाऱ्या पाण्याच्या संपर्कात आल्याने माणसांमध्ये पसरतो.

बर्ड फ्लूचे लक्षणं

  • कोरडा खोकला

  • घशात खवखव, नाक बंद होणे, नाक वाहणे

  • थकवा, डोकेदुखी

  • थंडी वाजून ताप येणे

  • अंग दुखी

  • छातीत दुखणे

टॅग्स :whobird flu