प्रदूषणामुळे वाढतोय 'डिमेंशिया'चा धोका; जीवनशैलीत करा 'हे' बदल! WHO ने सांगितले उपाय...

Air Pollution Linked To Dementia Risk: जीवनशैलीतील बदल आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवल्यास डिमेंशियाची तब्बल ४५ टक्के प्रकरणे टाळता येऊ शकतात. यामध्ये पहिल्यांदाच वायुप्रदूषणाचा समावेश करण्यात आला आहे...
Long-Term Pollution Triggers Memory Loss

Long-Term Pollution Triggers Memory Loss

esakal 

Updated on

Long-Term Pollution Triggers Memory Loss: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) डिमेंशियाबाबत (स्मृतीभ्रंश) महत्त्वाची आणि नवीन जागतिक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. २०१३ नंतरचे हे पहिले मोठे अपडेट असून, वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली मेंदूच्या आरोग्यावर कसा घातक परिणाम करत आहेत, हे यात अधोरेखित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, डिमेंशियाच्या कारणांमध्ये यावर्षी पहिल्यांदाच 'वायुप्रदूषणाचा' समावेश करण्यात आला आहे.

४५ टक्के प्रकरणे टाळता येणे शक्य

WHO च्या अहवालानुसार, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, शारीरिक निष्क्रियता आणि दीर्घकाळ वायुप्रदूषणाच्या संपर्कात राहणे यांसारख्या प्रमुख धोक्यांवर वेळीच नियंत्रण मिळवल्यास डिमेंशियाची जवळपास ४५ टक्के प्रकरणे टाळता किंवा लांबवता येऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com