Diet Plan : डाएटमध्ये कार्ब्स अन् फॅट किती असावे ? WHO ने याविषयी नवी गाइडलाइन जारी केली

WHO ने आहारात काय असावे आणि किती प्रमाणात असावे यासाठी गाइडलाइ जारी केली आहे. जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.
Diet Plan
Diet Planesakal

Diet Plan : कार्बोहायड्रेट्स आणि आहारातील हेल्दी फॅट्स तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हा ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे आणि तुमचा मेंदू जो मूत्रपिंड, हृदयाचे स्नायू आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या कार्यात मदत करतो. त्याचप्रमाणे, तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि तुमच्या शरीरातील पेशींच्या योग्य कार्यासाठी फॅट देखील आवश्यक असतात. त्यासाठी WHO ने आहारात काय असावे आणि किती प्रमाणात असावे यासाठी गाइडलाइ जारी केली आहे. जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.

फॅट तुमच्या शरीराच्या अवयवांचे संरक्षण करण्यास देखील मदत करते आणि तुमचे शरीर उबदार ठेवते. मात्र, फॅटच्या शरीरात प्रमाणात असावे यासाठीची काळजी न घेतल्यास कार्ब्स आणि फॅट अनेक आजारांना कारणीभूत ठरतात. म्हणूनच त्याच्या योग्य प्रमाणाची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कार्बोहायड्रेट आणि फॅटच्या दैनिक मर्यादेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

WHO ने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली

या तीन नव्या गाइडलाइनपैकी पहिल्या गाइडलाइनध्ये प्रौढांसाठी आणि लहान मुलांसाठी सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचे सेवन किती असावे ते सांगण्यात आले आहे. तर दुसऱ्यात गाइडलाइनमध्ये अनहेल्दी वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी फुल फॅटचे सेवन आणि तिसऱ्यात वयस्क आणि मुलांमध्ये कार्बोहायड्रेटचे सेवन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यामागचा मूळ हेतू असा की, वजन वाढणे. नॉन कम्युकेबल डिसीज, खाण्यापिण्यातून होणारे आजार जसे की टाइप -२ डायबिटीज, हृदयविकार यांसारख्या आजारांची रिस्क कमी करणे.

आहारातील फॅटबाबतच्या गाइडलाइनमध्ये, WHO सांगते की चांगल्या आरोग्यासाठी प्रमाण आणि गुणवत्ता या दोन्हीची काळजी घेणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात प्रौढांनी एकूण आहारातील चरबीचे सेवन 30% किंवा त्यापेक्षा कमी मर्यादेत केले पाहिजे. डब्ल्यूएचओने येथे हेही स्पष्ट केले आहे की दोन वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांनी फॅट म्हणून अनसॅच्युरेटेड फॅटचे सेवन केले पाहिजे.

Diet Plan
Diet Plan

फॅटचे प्रमाण किती असावे?

दररोजच्या कॅलरीजमध्ये 10% अनसॅच्युरेटेड फॅट आणि 1% ट्रान्स-फॅटी ऍसिडपेक्षा जास्त नसावे. निरोगी राहण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या दैनंदिन आहारात सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटऐवजी पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचा समावेश करावा. तर, कार्बोहायड्रेट्समध्ये, तुम्ही तुमची दैनंदिन गरज धान्य, भाज्या, फळे आणि कडधान्यांमधून पूर्ण करू शकता.

WHOने म्हटले आहे की तेल, लोणी, तूप, खोबरेल तेल, फॅटी फिश, दूध आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळते. ट्रान्स फॅट भाजलेले आणि तळलेले पदार्थ, पॅक केलेले स्नॅक्स, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये देखील आढळते.

Diet Plan
Healthy Breakfast: नाश्त्यामध्ये चुकूनही या 6 गोष्टी खाऊ नका, आरोग्याला पोहोचू शकते हानी

कोणते फॅट्स आरोग्यासाठी चांगले असते

निरोगी राहण्यासाठी, WHO ने लोकांना पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, वनस्पतींमधून मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् किंवा अनसॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स-फॅटी ऍसिडऐवजी संपूर्ण धान्य, भाज्या, फळे आणि कडधान्यांमधून कार्बोहायड्रेट घेण्याचा सल्ला दिला आहे.

WHOच्या गाइडलाइननुसार, 2 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना प्रामुख्याने संपूर्ण धान्य, भाज्या, फळे आणि कडधान्यांमधून कार्बोहायड्रेट मिळाले पाहिजे. प्रौढ व्यक्तीने दररोज किमान 400 ग्रॅम भाज्या आणि फळे खाणे आवश्यक आहे.

याशिवाय, आपल्याला 25 ग्रॅम पर्यंत नैसर्गिकरित्या आहारातील फायबर मिळायला हवे. मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी दररोज भाज्या आणि फळे खाण्याची शिफारस केली जाते. (Diet Plan)

वयानुसार काय खावे?

2-5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी दररोज किमान 250 ग्रॅम भाज्या आणि फळे

6-9 वर्षे वयोगटातील मुलांसाठी दररोज किमान 350 ग्रॅम भाज्या आणि फळे

10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी दररोज किमान 400 ग्रॅम भाज्या आणि फळे

Diet Plan
Pregnancy Diet : बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच गर्भवती महिलांनी सुरू करावा हा फायबरयुक्त आहार

आहारातील फायबर किती वापरावे?

2-5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी दररोज किमान 15 ग्रॅम

6-9 वर्षे वयोगटातील मुलांसाठी दररोज किमान 21 ग्रॅम

10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी दररोज किमान 25 ग्रॅम (health)

WHO चा उद्देश जगभरातील लोकांना आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी तळलेले प्रक्रिया केलेले आणि पॅक केलेले अन्न खाण्याऐवजी निरोगी अन्न खाण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com