

Is Fruit Juice Bad for Your Heart? Major Study Compares Whole Fruits vs Juice
esakal
World Heart Day: सकाळच्या वेळी ताज्या फळांचा एक ग्लास रस (ज्युस) पिणे हे आरोग्यदायी मानले जाते. अनेक लोक अख्खी फळे खाण्याऐवजी ज्युस पिण्याला प्राधान्य देतात. पण, नवीन संशोधनाने या सवयीबाबत मोठा इशारा दिला आहे. फळांचा रस पिण्यापेक्षा ताजी फळे खाणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असून फळांचा रस आरोग्यासाठी अख्ख्या फळांइतका उपयुक्त ठरू शकत नाही, असे या अभ्यासात समोर आले आहे.
अमेरिकेतील 3,71,000 पेक्षा जास्त नागरिकांच्या आहारातील सवयींचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. 'करंट डेव्हलपमेंट्स इन न्यूट्रिशन' (Current Developments in Nutrition) मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, ज्या लोकांना उच्च रक्तदाब (High Blood Pressure), हाय कोलेस्ट्रॉल, किंवा हृदयाचे आजार आहेत, असे लोक ताजी फळे कमी प्रमाणात खातात.