Diabetes Patient : डायबिटीज असणाऱ्यांनी चुकूनही करू नये Smoking; नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes Patient

Diabetes Patient : डायबिटीज असणाऱ्यांनी चुकूनही करू नये Smoking; नाहीतर...

Diabetes Patient : डायबिटीज हा आजार आहे जो एकदा माणसाच्या नशिबी आला की आयुष्यभर असतो. त्यामुळे डायबिटीज नियंत्रणात ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे डॉक्टर नेहमी डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना हे खाऊ नका, ते करू नका, असा सल्ला देतात पण तुम्हाला माहिती आहे का डायबिटीज पेशंटनी स्मोकींग सुद्धा करू नये. (why Diabetes Patient never do smoking read disadvantages)

एस्पर्टच्या मते, मधूमेही रुग्णांनी स्मोकींग सुद्धा करू नये कारण धुम्रपानाचा मधूमेहावर विपरीत परिणाम होतो. वाढत्या मधुमेहासोबत जर तुम्ही धुम्रपान केले तर अनेक गंभीर आजारांचाही धोका वाढतो. डायबिटीज पेशंटनी जर स्मोकींग केली तर काय गंभीर परिणाम होतात, याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: Diabetes Patients : हिवाळ्यात डायबिटीस रूग्णांची इम्यूनिटी वाढवणारे 4 उपाय

  • जर मधुमेह असेल आणि धूम्रपान किंवा तंबाखूचे व्यसन करत असाल तर त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते.

  • धूम्रपानामुळे शरीरातील ग्लुकोज अनकंट्रोल होतं.

  • याशिवाय अति जास्त धुम्रपान करणाऱ्या लोकांना मधूमेहाचा धोका अधिक असतो.

हेही वाचा: Diabetes Disease : तुमच्याही मनात आहेत का मधुमेहाबाबतचे हे गैरसमज ? लगेच दूर करा

मधूमेह असताना जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर किडन्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

जर तुम्ही मधूमेहाचे रुग्ण आहात तर धुम्रपान करु नका कारण धुम्रपानाच्या धुरामुळे धमन्या अधिक हार्ड होतात. यामुळे मधुमेह कंट्रोलच्या बाहेर जातो.