Joint Pain : हिवाळ्यात वृद्धांना का जाणवते सांधेदुखी ? अशी असतात लक्षणे

हिवाळा ऋतू हा विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांना आमंत्रण देतो. एखाद्याला गुडघे, नितंब, घोटे, हात आणि पायांच्या वेदना सतावतात.
Joint Pain
Joint Paingoogle

मुंबई :- हिवाळ्यामुळे केवळ श्वसनसंस्था किंवा त्वचेच्या संबंधित समस्याच नाही तर वयोवृद्धांमध्ये सांधेदुखीचाही त्रास देखील बळावतो. त्यासाठी उबदार कपडे घाला, दररोज व्यायाम करा आणि योग्य वजन राखा, दुखत असलेल्या सांध्यावर हीटिंग पॅडचा वापर करा, यामुळे लोकांना सांधेदुखीचे व्यवस्थापन करण्यात मदत होऊ शकते.

हिवाळा ऋतू हा विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांना आमंत्रण देतो. एखाद्याला गुडघे, नितंब, घोटे, हात आणि पायांच्या वेदना सतावतात. हिवाळ्यात, मर्यादित प्रमाणात सूर्यप्रकाश असतो आणि शरीराच्या भागांना कमी रक्तपुरवठा होतो, ज्यामुळे एखाद्याचे सांधे आखडतात आणि दुखू लागतात.

शिवाय स्नायू आणि आसपासच्या ऊतींचा विस्तार आणि वेदना होतात. थंड हवामानामुळे स्नायूंवर ताण येऊन सांधे दुखू शकतात. सांधेदुखी सामान्यतः ६० ते ८५ वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येते. साधेदुखीच्या या समस्येबद्दल सांगत आहेत अपोलो स्पेक्ट्राचे ऑर्थोपेडीक सर्जन डॉ विश्वजीत चव्हाण.

Joint Pain
Osteoarthritis Physiotherapy : सांध्यांच्या वेदना कमी करतील हे व्यायामप्रकार

तज्ज्ञांच्या मते पावसाळा सुरू होताच सांधेदुखीत ५० टक्क्यांनी वाढ होते. तापमान घसरल्याने तुमच्या सांध्यांवर परिणाम का होतो याचे कोणतेही स्पष्टीकरण नाही.

हिवाळा आणि सांधेदुखीचा परस्पर संबंध आहे. हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते आणि त्यामुळे सांधे कमकुवत होतात. सांधेदुखी सामान्यतः 60 ते 85 वयोगटातील प्रौढांमध्ये दिसून येते.

ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधीच संधिवात असल्याचे निदान झाले आहे त्यांनी थंडीच्या महिन्यात अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. व्हिटॅमिन डी चाचणी शरीरातील व्हिटॅमिन डीच्या पातळी जाणून घेण्यास मदत करते. जर तुम्हाला सांधेदुखी असेल तर व्हिटॅमिन डी 3 चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.

Joint Pain
Arthritis : मान, कंंबर, खांदे, गुडघे यांतील वेदनेमुळे येऊ शकतो heart attack

हिवाळ्यात सांधेदुखीपासून बचाव करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे भाज्या, तृणधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये आणि हंगामी फळे यांचा समावेश असलेला पौष्टिक आहार घ्या. पालक, कोबी, टोमॅटो आणि संत्री यांचा आहात समावेश करण्यास विसरू नका यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश आहे.

स्ट्रेचिंग आणि हलक्या वजनांचा समावेश असलेले व्यायाम सांधेदुखीचा सामना करण्यास मदत करू शकतात. सांध्यांची लवचिकता सुधारण्यासाठी आणि सांधेदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी सायकलिंग, चालणे, एरोबिक्स आणि पोहणे यासारख्या इतर क्रियाकलाप करण्याचा प्रयत्न करा.

उबदार रहा, गरम पाण्याने अंघोळ करा, जड वस्तू उचलणे टाळा, सांधेदुखीचा सामना करण्यासाठी हीटिंग पॅड वापरा आणि वजन नियंत्रित ठेवा. पुरेसे पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा.केवळ डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या.

खालील तक्रारी उद्भवल्यास त्वरीत डॉक्टरांची मदत घ्या

जर वेदना वाढत गेली तर तुम्ही वैद्यकीय मदत घ्यावी कारण या वेदनेमागे इतर अनेक कारणे देखील असू शकतात. तुम्ही जास्त काळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका असेही डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

. सांध्यामध्ये सूज

· वेदनांमध्ये वाढ होणे

· हालचालींवर मर्यादा येणे

· लंगडत चालणे

· लालसरपणा येणे

· ताप येणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com