Women Life | काही महिलांना दाढी-मिशी का येते ? चेहऱ्यावरचे हे केस घालवायचे कसे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women with mustache and beard

Women Life : काही महिलांना दाढी-मिशी का येते ? चेहऱ्यावरचे हे केस घालवायचे कसे ?

मुंबई : टेस्टोस्टेरॉन हा एक पुरूष हार्मोन असतो जो सर्व महिलांमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध असतो. एस्ट्रोजेन हा स्त्री हार्मोन महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो.

हे दोन्ही हार्मोन्स मिळून महिलांमध्ये पुनरुत्पादक ऊती, वर्तणूक, शारीरिक विकास, इत्यादी गोष्टींची काळजी घेतात; मात्र टेस्टोस्टेरॉनची पातळी अतिरिक्त प्रमाणात असल्यास महिलांमध्ये काही शारीरिक समस्या निर्माण होतात. (women with mustache and beard)

या समस्यांपैकीच एक म्हणजे चेहऱ्यावर दाढी-मिशी येणे म्हणजेच चेहऱ्यावर केस येणे. याला वैद्यकीय भाषेत हिर्सुटिज्म (Hirsutism) म्हणतात. या समस्येमागील कारणे सविस्तर जाणून घेऊ. हेही वाचा - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी' ?

हेही वाचा: Women Life : डोक्यावरचा एक-एक केस उपटून टाकतात महिला नागा साधू

कारणे

१. PCOS : PCOS किंवा PCOD रोग हे स्त्रियांच्या चेहऱ्यावर जास्त केस येण्याचे मुख्य कारण आहे. या आजारात शरीरातील सेक्स हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागते. त्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त केस वाढू लागतात.

२. एन्झाईमची कमतरता : महिलांच्या शरीरात एन्झाईम्सच्या कमतरतेमुळे शरीरात पुरुष हार्मोन टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असते. यामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर अतिरिक्त केस वाढण्याची समस्या उद्भवते.

३. हायपरट्रिकोसिस : याला वेअरवॉल्फ सिंड्रोम असेही म्हणतात आणि हे हायपोथायरॉईडीझम, अॅक्रोमेगाली (शरीरातील वाढीच्या संप्रेरकाचे प्रमाण), कुपोषण आणि एचआयव्हीसारख्या अनेक रोगांमुळे देखील होऊ शकते.

हायपरट्रिकोसिसमुळे, नाकाच्या टोकाजवळ आणि कानाजवळ जास्त केस वाढू लागतात.

४. कुशिंग सिंड्रोम : ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये एड्रिनल ग्लँड व्यत्ययामुळे शरीर अतिरिक्त कॉर्टिसोल तयार करण्यास सुरुवात करते ज्याला स्ट्रेस हार्मोनदेखील म्हणतात.

केसांची जास्त वाढ, जास्त वजन वाढणे, उच्च रक्तदाब आणि चिडचिडेपणा देखील कुशिंग सिंड्रोमने ग्रस्त महिलांमध्ये दिसून येतो.

५. औषधे : अनेक वेळा काही औषधांमुळे महिलांच्या शरीरावर नको असलेले केस वाढू लागतात.

हार्मोनल थेरपी आणि एंडोमेट्रिओसिसच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे आणि मल्टीपल इन्फ्लेमेशनच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्‍या ग्लुकोकोर्टिकोइड्समुळे देखील स्त्रियांमध्ये केसांची असामान्य वाढ होते.

women with mustache and beard

women with mustache and beard

हेही वाचा: Women Life : मुलींच्या शर्टाची बटणे डाव्या बाजूलाच का असतात ?

उपाय

प्लकिंग : प्लकरच्या मदतीने भुवया, वरचा ओठ आणि हनुवटीजवळचे अतिरिक्त केस काढले जाऊ शकतात; परंतु चेहऱ्यावरील केसांची वाढ जास्त असल्यास ही पद्धत प्रभावी ठरणार नाही.

शेव्हिंग : चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी तुम्ही वस्तरा देखील वापरू शकता. शेव्ह केल्यानंतर तो भाग पाण्याने स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावा.

क्रिम्स : अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी डिपिलेटरी क्रीम वापरणे हा एक वेदनारहित मार्ग आहे.

हेअर रिमूव्हल एरियावर क्रीम लावा. स्पॅटुलाने पसरवा. ५-१० मिनिटे बसू द्या आणि नंतर स्पॅटुलाच्या मदतीने क्रीमसह केस काढा.

वॅक्सिंग : तुम्ही घरच्या घरी वॅक्सिंगच्या मदतीने चेहऱ्यावरील नको असलेले केस काढू शकता. यासाठी हॉट वॅक्सऐवजी वॅक्सिंग स्ट्रिप वापरू शकता.

थ्रेडिंग : एका विशिष्ट प्रकारच्या सुती धाग्याच्या साहाय्याने एक एक करून नको असलेले केस काढले जातात. तुम्ही पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन थ्रेडिंगद्वारे नको असलेले केस काढू शकता.

एपिलेटर : एपिलेटरच्या साहाय्याने नको असलेले केस मुळापासून उपटून काढून टाकता येतात. ते वापरताना खूप त्रास होतो.

लेझर उपचार : डॉक्टर लेझर प्रकाशाच्या मदतीने केसांची मुळे कमकुवत बनवतात. त्यामुळे केसांची वाढ कमी होते.

इलेक्ट्रोलिसिस : यामध्ये, डॉक्टर हेयर फॉलिकल्समधून विद्युत प्रवाह सोडतात. त्यामुळे केस खराब होतात आणि ते पुन्हा वाढत नाहीत.

ब्लिचिंग : ब्लीच केल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त केस काढले जात नाहीत परंतु त्यांचा रंग फिकट होतो ज्यामुळे ते कमी दिसतात. कोणत्याही प्रकारचे ब्लीच थेट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.