

Why Eyes Twitch? Stress Or Weakness?
esakal
Eye Twitching Cure: सामान्यतः डोळा फडकणे ही एक सामान्य प्रक्रिया मानली जाते. अनेकदा लोक याला जुन्या समजुतींशी किंवा शकुन-अपशकुनाशी जोडतात. पण,वैद्यकीय शास्त्रानुसार जर तुमचा डोळा वारंवार किंवा सतत फडकत असेल, तर ते आरोग्याशी संबंधित एखाद्या मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते. वैद्यकीय भाषेत या समस्येला 'बिनाइन एसेंशियल ब्लेफेरोस्पाज्म' (BEB) असे म्हणतात. हा त्रास कोणालाही होऊ शकतो, परंतु मध्यमवयीन आणि वृद्ध महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त पाहायला मिळते. वेळेवर याकडे लक्ष न दिल्यास याचा दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो.