Hot Milk Benefits : दूध उकळणे गरजेचे का आहे? फायदे वाचून तुम्हीही वाल चकीत

दूध थंड करण्याऐवजी उकळल्यास त्याचे पौष्टिक मूल्य वाढते
Hot Milk Benefits
Hot Milk Benefitsesakal

Hot Milk Benefits : दुधात अनेक पोषक तत्व असतात. बहुतेक आरोग्य तज्ञ दररोज एक ते दोन ग्लास दूध पिण्याची शिफारस करतात कारण या सुपरफूडमध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. दुधाद्वारे आपल्या शरीराला कॅल्शियम, प्रथिने, नैसर्गिक चरबी, कॅलरीज, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-2 आणि पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक घटक मिळतात. ग्रेटर नोएडा येथील GIMS हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, दूध थंड करण्याऐवजी उकळल्यास त्याचे पौष्टिक मूल्य वाढते.

जंतू मरतात

दूध गरम केल्यानंतर ते पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दुधात असलेले हानिकारक जंतू नष्ट होतात. या प्रक्रियेला पाश्चरायझेशन म्हणतात. याशिवाय गरम दूध प्यायल्याने शरीराला अधिक ऊर्जा मिळते.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी

एक ग्लास गरम दूध प्यायल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता आणि हेच कारण आहे की कमी आहार घेतल्याने तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते.

झोपेची कमतरता राहणार नाही

प्रत्येक व्यक्तीने रात्रीच्या वेळी एक ग्लास कोमट दूध प्यायले पाहिजे, यामुळे शरीर आणि मनाला खूप आराम मिळतो. असे केल्याने, झोपेची गुणवत्ता सुधारते ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी थकवा जाणवत नाही.

हाडे मजबूत होतील

दुधात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. गरम दूध प्यायल्याने हाडांची घनता वाढते आणि तुमचे शरीर पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बनते.

Hot Milk Benefits
Raw Or Boiled Milk : कच्चं की उकळलेलं, आरोग्यासाठी कोणतं दूध फायद्याचं? वाचा एक्सपर्टचा सल्ला

मधुमेहासाठी फायदेशीर

जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधाचे सेवन केले तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. म्हणूनच असे करणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com