
न्यूयॉर्क - गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या खूपच कमी झाल्याचं समोर आलं आहे. अपत्य होण्यामध्ये यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. काउंटडाउन (Countdown) नावाच्या एका पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे. यामध्ये पाश्चिमात्य देशातील पुरुषांमध्ये गेल्या चाळीस वर्षात शुक्राणुंचे प्रमाण हे अर्ध्यावर आलं आहे. एवढंच नाही तर हे असंच सुरु राहिलं तर पुढच्या चाळीस वर्षात प्रजनन क्षमताच नाहीशी होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. एपिडेमिओलॉजिस्ट असलेल्या शन्ना स्वॅन (Shanna Swan) यांनी काउंटडाउनमध्ये केलेल्या दाव्यासाठी अनेक पुरावेही दिले आहेत. त्यांचा हा दावा धक्कादायक आणि आश्चर्यचकीत करणारा आहे. पुढच्या फक्त 40 वर्षात पुरुषांमधील प्रजनन क्षमता कमी होईल असा हा दावा आहे. कन्वर्सेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात याबाबत माहिती दिली आहे. (Why in 40 years sperm count in men has fallen by over 50 percent)
काउंटडाउनमध्ये केलेल्या दाव्यानुसार विचार केला तर 2060 मध्ये पुरुषांमध्ये प्रजनन क्षमताच उरणार नाही. यासाठी अनेक पुरावे दिले असून त्यामध्ये प्रजनानातील विरोधाभास आणि प्रजननात झालेली घट मानव आणि वन्यप्राणी अशा दोन्हींमध्ये दिसून येत आहे. आता हेच चित्र पुढे राहिल का हे सांगणं कठीण आहे. जर काउंटडाउनमध्ये केलेल्या दाव्यानुसार घडत राहिलं तर मानव जात शिल्लक राहणार नाही. मात्र यामागे असलेलं प्रमुख कारणही सांगण्यात आलं आहे. आपण रोजच्या जीवनात वापरत असलेली केमिकल्स याला कारणीभूत आहेत. त्यामुळे हे संकट दूर करायचं असेल तर मानवी शरीरावर केमिकल्सचा होणारा परिणाम रोखण्याची गरज आहे.
स्वॅन यांनी त्यांच्या किताबात अनेक संशोधनांचा उल्लेख केला आहे. यामध्ये काही संशोधनात अशी माहिती आहे की ज्यामध्ये मानवात शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याचं समोर आलं आहे. स्वॅन यांचे म्हणणे आहे की, 2045 पर्यंत अनेक दाम्पत्यांना मुलं जन्माला घालण्यासाठी इतर उपाय वापरावे लागतील. यासोबतच गर्भपाताचा दर आणि प्रजननासंबंधी इतर समस्यासुद्धा वाढत जात आहेत. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होत आहे.
शुक्राणूंची संख्या कमी होण्याचं कारण हे गेल्या 50 वर्षात म्हणजेच 1973 पासून लाइफस्टाइलमध्ये झालेला बदल हे आहे. यामध्ये डाएट, स्थूलपणा, मद्यप्राशन इत्यादींचा समावेश आहे. अलिकडच्या वर्षात संशोधकांना शूक्राणूंचा स्तराबाबत संकेत दिला आहे ज्यावर लाइफस्टाइलमुले परिणाम होतो. यातूनच भ्रूण पुरुषांच्या विशेषता विकसित करत असतात त्यांना हार्मोनमधील बदल भविष्यात होणाऱ्या प्रजनन क्षमतेवरही प्रभाव टाकतात. सुरुवातीला प्राण्यांमध्येही अशा प्रकारचे परिणाम झाल्याचं अभ्यासातून समोर आलं होतं.
हार्मोनच्या बाबतीत निर्माण होणारे अडथळे केमिकल्समुळे होतात जे आपल्या रोजच्या वापरातून शरीरात जातात. त्यांची स्वत:च हार्मोनप्रमाणे काम करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे सुरुवातीच्या वाढीमध्ये अडथळा येतो आणि काम करण्याची क्षमता विकसित होण्यापासून थांबवते. अशी केमिकल्स फक्त खाण्यापिण्यातून नाही तर हवेतूनही शरीरात पोहोचतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.