

Why Did Dr. Shriram Nene turn vegan: प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी अलीकडेच आपल्या फिटनेस प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. एका हेल्थ चेकअपमध्ये धोकादायक आरोग्य चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांनी जीवनशैलीत मोठा बदल केला. त्यांनी संपूर्णपणे व्हेगन आहार स्वीकारला आणि मद्यपान बंद केले. या सकारात्मक बदलांमुळे त्यांनी १८ किलो वजन कमी केलं आणि शरीरातील चरबी (बॉडी फॅट) केवळ १६ टक्क्यांवर आणली.