
Illustration showing how Alzheimer’s symptoms and progression differ between men and women.
Sakal
- डॉ. राकेश रंजन
अल्झायमर हा सध्याच्या काळात झपाट्याने वाढणारा व मोठ्या आरोग्य आव्हानांपैकी एक ठरत आहे. जगभरातील साडेपाच कोटींहून अधिक लोक स्मृतीभंशासह (डिमेंशिया) जगत आहेत व आणि स्त्रिया या संकटाच्या केंद्रस्थानी आहेत म्हणजेच त्या यामुळे अधिक प्रभावित आहेत. अभ्यासानुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना केवळ अल्झायमर होण्याचा धोका अधिक नाही तर तुलनेत या आजाराचा वेगही त्यांच्यामध्ये अधिक आहे.