

Why women feel colder than men?
sakal
Men and Women Cold Sensitivity: हिवाळा सुरू झाला की काही जणांना थंडीची फारशी जाणीव होत नाही, तर काहींना मात्र थोडासा गार वारा आला तरी हुडहुडी भरते. विशेषतः घरात किंवा ऑफिसमध्ये एसी सुरू असताना पुरुषांच्या तुलनेत महिलांना लवकर थंडी वाजते, असं अनेकदा पाहायला मिळतं. त्यामुळे एसीचं तापमान कमी करण्यावरूनही घरात छोटे-मोठे वाद होतात. पण महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी का वाजते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे केवळ शरीराची ठेवण नाही, तर रक्तप्रवाह, स्नायू आणि हार्मोन्सशी संबंधित काही महत्त्वाची वैज्ञानिक कारणं आहेत.