हिवाळ्यातील आहार

Winter Diet Tips: Ayurvedic Foods and Healthy Eating Habits for Better Health : हिवाळ्यात भूक आणि पचनशक्ती वाढत असल्याने योग्य आहार घेणे महत्त्वाचे ठरते. पौष्टिक नाश्ता, डिंकाचे लाडू, सुकामेवा, तूप आणि नियमित व्यायामाच्या मदतीने आरोग्य जपता येते.
Winter Diet Tips: Ayurvedic Foods and Healthy Eating Habits for Better Health

Winter Diet Tips: Ayurvedic Foods and Healthy Eating Habits for Better Health

esakal

Updated on: 

हिवाळा हा सर्वांना हवाहवासा वाटणारा काळ! पावसाळ्यातल्या दमटपणाची काळजी किंवा उन्हाळ्यातल्या उकाड्याचा त्रास हिवाळ्यात अजिबात नसतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी एखादी शाल, मफलर, अगदी जास्त थंडी वाजायला लागली तर पायमोजे, माकडटोपी जवळ असली की हिवाळा सहज सुसह्य होऊ शकतो. आयुर्वेदातही हिवाळ्यातल्या हेमंत ऋतूला ऋतुराज म्हटले आहे.

हिवाळ्यात भूक जास्त लागते हा बहुतेक सर्वांचा अनुभव असेल. याचे कारण असे की बाहेरच्या थंडीमुळे शरीरातील उष्म्याला बाहेर जायला अवरोध उत्पन्न होतो व तो अवरोध शरीराच्या आत केंद्रित झाल्याने शरीरातल्या अग्नीला अधिक प्रदीप्त करतो, ज्यामुळे भूक अधिक लागते व खाल्लेले अन्न पचविण्याची क्षमताही सुधारते. आयुर्वेदात आरोग्याच्या दृष्टीने या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला सांगितलेला आहे.

Loading content, please wait...