Winter Health : हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्या कशा वाढतात ?

थंड हवामानामुळे हृदयाच्या समस्या वाढू शकतात.
Winter Health
Winter Healthgoogle

मुंबई : तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या असतील तर अतिथंड वातावरणात या समस्यांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. थंडीमुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात छातीत दुखणे आणि हृदयविकाराचा झटका येणे प्रमाण अधिक वाढते. याबद्दल सांगत आहेत मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे कार्डियाक सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे.

थंड हवामानाचा तुमच्या हृदयावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हिवाळा जरी आल्हाददायक असला तरी त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांचा धोका वाढू शकतो. थंड हवामानामुळे हृदयाच्या समस्या वाढू शकतात.

थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताची शक्यता वाढते. कोरोनरी हार्ट डिसीजमुळे एनजाइना किंवा छातीत दुखणे तसेच हिवाळ्यात जेव्हा थंड हवामानामुळे आणि तापमानात अचानक घट झाल्यामुळे कोरोनरी धमन्या आकुंचन पावतात.

Winter Health
Heart Attack : पुरुषांपेक्षा महिलांना कमी असतो हार्ट अॅटॅकचा धोका; जाणून घ्या कारणे

जसजसे तापमान कमी होते, तसतसे शरीराचे आणि हृदयाला शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. यामुळे हृदयावरील दाब वाढू शकतो आणि हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअरचा धोका वाढू शकतो.

हिवाळ्यात पहाटेच्या वेळी रक्तदाब वाढतो ऱ्हदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा स्ट्रोकचा धोका देखील जास्त असतो. कमी तापमानामुळे रक्तवाहिन्या संकुचित होऊ शकतात ज्यामुळे उच्च रक्तदाब होऊन रक्त गोठू शकते. हिवाळ्यात आपल्या हृदयाची अत्यंत काळजी घ्यावी.

Winter Health
Heart attack : वेळेवर उपचार न घेणे जवळपास ७०% हृदयविकार झटक्यांसाठी कारणीभूत

थंड वातावरणात हृदय कसे निरोगी ठेवायचे

जर बाहेरचे हवामान थंड असेल तर तुमच्यासाठी योग्य पोशाख परिधान करणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये पूर्ण बाह्यांचे कपडे आणि स्वेटर घाला.

थंड वातावरणात बाहेर जाण्याऐवजी घरच्या घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायामामुळे तुम्हाला इष्टतम वजन राखण्यात आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तुमचा रक्तदाब योग्य श्रेणीत ठेवण्याचा प्रयत्न करा. अल्कोहोल आणि धूम्रपान टाळणे योग्य राहिल. नियमित हृदय तपासणीसाठी करणे आवश्यक आहे आणि तुमचे हृदय उत्तम प्रकारे कार्यरत आहे का याची खात्री करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com