Dangerous Disease : एकाएकी महिला रशियन बोलायला लागली, तपासणी केली अन् निघाला हा गंभीर आजार

तीन वेगवेगळ्या उच्चारांमध्ये बोलणारी ती स्त्री अचानक स्वतःचा उच्चार विसरली आणि रशियन उच्चारात बोलू लागली, ज्याची तिला जाणीवही नव्हती
Dangerous Disease
Dangerous Diseaseesakal

Dangerous Disease : आपण आपली भाषा (उच्चार) बोलण्याची पद्धत विसरून दुसर्‍या देशाचे उच्चार बोलू लागणे असे घडू शकते काय? तुम्हाला ऐकून थोडं विचित्र वाटत असेल, पण टेक्सासमधल्या एका महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. तीन वेगवेगळ्या उच्चारांमध्ये बोलणारी ती स्त्री अचानक स्वतःचा उच्चार विसरली आणि रशियन उच्चारात बोलू लागली, ज्याची तिला जाणीवही नव्हती किंवा रशियन उच्चारांशी तिचा संबंधही नव्हता. असे का घडले जाणून घेऊया.

अॅबी फेंडर असे या महिलेचे नाव असून नुकतीच तिच्यावर हर्निएटेड डिस्क दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे शस्त्रक्रियेनंतर महिलेला जाग आली तेव्हा तिचा आवाज बंद झाला होता आणि तिचा टेक्सन उच्चारही गायब झाल्याचे पाहून ती थक्क झाली. ही महिला माजी गायिकासुद्धा आहे. तिने सांगितले की तिचा रशियाशी कोणताही संबंध नाही आणि ती येथे राहिली नाही. हा सर्व प्रकार पाहून डॉक्टरांना धक्काच बसला.

Dangerous Disease
Rare Disease: माणूस नव्हे का? प्राण्यासारखी वागणूक देतात अन् दिसताच दगडफेक; जगात केवळ 50 लोकांना हा आजार

आढळला 'फॉरेन एक्सेंट सिंड्रोम'

महिलेची तपासणी झाली असता ही महिला 'फॉरेन अॅक्सेंट सिंड्रोम'ने ग्रस्त असल्याचे समोर आले. 39 वर्षीय अॅबीची ही स्थिती इतकी दुर्मिळ आहे की जगभरात केवळ 100 प्रकरणे दिसतात. ती महिला म्हणाली, 'मला भीती वाटते की मी पुन्हा कधीही सामान्यपणे बोलू शकणार नाही. माझ्या आवाजाची पिच खूप उंच झाली आहे. मी ज्या अनोळखी लोकांशी बोलले ते माझे उच्चार ऐकून हसू लागले. (Disease) सुरुवातीला गंमत वाटल्यामुळे मी कधीच नाराज नव्हती, पण आता तसे नाही. कधीकधी मला असे वागवले जाते की जणू मी अमेरिकन देखील नाही.

Dangerous Disease
Infectious Diseases : वातावरण बदलांनी वाढल्‍या आरोग्‍याच्‍या तक्रारी; तापमानात वाढ!

2021 मध्ये तिला मदत मिळाली

शस्त्रक्रियेपूर्वी अॅबी एक व्यावसायिक गायक होती. वयाच्या 11 व्या वर्षी तिने गायला सुरुवात केली. अॅबी सांगते की 2021 मध्ये तिला खूप मदत मिळाली. मसल मेमरी आणि थेरपीच्या मदतीने तिची गाण्याची पिच परत आली. ती म्हणाली, 'मी एक उत्तम स्पीच पॅथॉलॉजिस्ट पाहिला, ज्यांनी माझी पिच कमी करण्यात मला खूप मदत केली. यामुळे माझ्या मानेतील नसाही मोकळ्या झाल्या, आणि त्यामुळेच मी माझा आधीचा आवाज परत मिळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com